SYSTEM
जळगाव

बहिणीची वेडी माया; दैव बलवत्तर म्हणून वाचले दर्शनचे प्राण!

दर्शन मोतीलाल चौधरी अपघात झालेल्या इंदूर-अमळनेर याच बसने प्रवास करणार होता.

हिरालाल पाटील

कळमसरे (ता. अमळनेर) : येथील दर्शन मोतीलाल चौधरी अपघात झालेल्या इंदूर-अमळनेर याच बसने प्रवास करणार होता. मात्र, पाऊस सुरू असल्याने त्याला बहिणीने थांबविल्याने त्याचे प्राण वाचले. भावाप्रति काळजी घेणाऱ्या बहिणीची वेडी माया असते, त्याची प्रचिती आली. (Indore Bus Accident)

येथील दर्शन चौधरी गेल्या पाच ते सहा दिवसांपासून इंदूरला असलेल्या बहिणीला भेटायला गेला होता. वडील मोतीलाल चौधरी यांनी रविवारी (ता. १७) दर्शनला घरी येण्यासाठी फोन केला होता. अमळनेर-इंदूर बसने सकाळी येतो, असे त्याने वडिलांना सांगितले अन्‌ सोमवारी (ता. १८) सकाळी संबंधित बसने यायला निघाला. बस सुटेल, म्हणून घाई करणाऱ्या भाऊरायाला बहिणीने पाऊस सुरू आहे. उशिरा नीघ, सांगत दर्शनला थांबविले अन्‌ ही घटना टळली. एकुलता एक भाऊ बहिणीच्या काळजीने या अपघातातून वाचला. (Latest Marathi News)

दरम्यान, उशिराने दर्शन कळमसरे येथे पोचल्याने त्याला भेटण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. आपल्या मोठ्या बहिणीने आणि पाहुण्यांनी सोमवारी सकाळी काळजीपोटी मला थांबविले नसते, तर मीही या वाईट दुर्घटनेत वाचू शकलो नसतो, असे म्हणत घरी आल्यावर त्याने आपल्या आई-वडिलांना मिठी मारली. या वेळी त्याला अश्रू अनावर झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

US Iran Tensions : अमेरिका कधीही सुरु करु शकते युद्ध, सैन्य तैनात करणे फक्त इशारा नाही, इराणला कोणी केले सावध ?

IND vs PAK : प्लॅन फसला! पराभवानंतर पाकिस्तानच्या कॅप्टननं स्पिनर्सवर फोडलं खापर; म्हणाला, चुकांची किंमत मोजली

मुलुंड दुर्घटनेनंतर MMRDAने घेतली धास्ती, ताकही फुंकून पिणार; मेट्रो-४ मार्गिकेबाबत मोठा निर्णय

Construction Worker Scam: बीडमध्ये तीन हजार द्या अन् बांधकाम कामगार बना; कष्टकऱ्यांच्या घामावर डल्ला, बोगस नोंदी, कोट्यवधींच्या निधीवर दरोडा!

SCROLL FOR NEXT