crime esakal
जळगाव

Latest marathi news | चाकूचा धाक दाखवत तरुणाला लुटले

याबाबत जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमीच्या गेटसमोर तीन अनोळखी व्यक्तींनी एकाची दुचाकी अडवून चाकूचा धाक दाखवत रोकड आणि मोबाईल असा एकूण २२ हजार २६० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Latest marathi news)

शहरातील महावीरनगर येथे योगेश परमानंद सोनी कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. ते सोनारी कारागीर आहेत. शुक्रवारी (ता. ८) रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास ते त्यांची दुचाकी घेऊन शिवाजीनगर परिसरातील स्मशानभूमीच्या गेट समोरून जात असताना एका तरुणाने त्यांची दुचाकी अडवली. त्यानंतर त्याला चाकूचा धाक दाखवून दुसरा आरोपी आल्यानंतर त्याने मिरचीची पावडर योगेश सोनीच्या डोळ्यात टाकली आणि झटापट झाली. यामध्ये योगेश सोनीच्या हातातील बॅग, मोबाईल आणि रोकड असा एकूण २२ हजार २६० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी योगेश परमानंद सोनी यांनी जळगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mehul Choksi: मोठी बातमी! फरार उद्योगपती मेहुल चोक्सीचा खेळ संपला; लवकरच भारतात परतणार, अखेर प्रत्यार्पणाला मान्यता

banned cough syrup seized : मोठी कारवाई! मालगाडीतून तब्बल दोन कोटींचे प्रतिबंधित 'कफ सिरप' जप्त

Pune Crime : गंगाधाम रस्त्यावर व्यापाऱ्याला भरदिवसा लुटले, ४५ हजारांची रोकड हिसकावली

PMC Development : पुणेतील ९ गावांचा प्रारूप विकास आराखडा जाहीर, नागरिकांना हरकती नोंदविण्यासाठी ६० दिवस

Rabi Season Maharashtra : रब्बीचे क्षेत्र ६५ लाखापर्यंत वाढण्याचा अंदाज : कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे

SCROLL FOR NEXT