crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणावर केला चाकू हल्ला

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील तुकाराम वाडी येथे दोघांमध्ये सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला तिघांनी शिवीगाळ करत मारहाण केली. (young man who went to settle fight was attacked with knife jalgaon crime news)

त्यापैकी एकाने चाकूने वार करून गंभीर दुखापत केली. शनिवारी (ता.२) रात्री साडेदहाला घडलेल्या प्रकाराबद्दल एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

अनिस हमीद शेख (वय ३२, रा. शिरसोली नाका, तांबापुरा भाग) याचा मित्र अरुण गोसावी यांचे तुकाराम वाडीतील काही तरुणांसमवेत भांडण सुरू होते.

त्यावेळी भांडण सोडवण्यासाठी अनिस गेला. त्याचा राग असल्याने संशयित भल्ल्या (पूर्ण नाव माहीत नाही) आणि सोबतच्या अनोळखी तरुणांनी शिवीगाळ व मारहाण केली.

भल्ल्याने चाकूने वार करत अनिसला जखमी केले. अनिसला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. पोलीस नाईक सुनील सोनार तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT