young woman attacked soldier with knife jalgaon news
young woman attacked soldier with knife jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : तुला जिवंत सोडणार नाही म्हणत... तरुणीचा सैनिकावर चाकूहल्ला

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : येथील तलाठी कॉलनी भागात राहणाऱ्या सैनिकावर शहरातीलच तरुणीने घरी जाऊन कुटुंबीयांसमोर चाकूहल्ला करून जखमी केल्याप्रकरणी तरुणीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आला आहे.

जखमी सैनिक नीलेश बोरसे यांची बहीण योगिनी बोरसे यांनी तक्रार दिली, की मी सुट्टीवर घरी आले असता शुक्रवारी (ता. १५) रात्री साडेनऊच्या सुमारास घराबाहेर शिवीगाळ व आरडाओरड ऐकून आम्ही सगळे बाहेर आलो. ( young woman attacked soldier with knife jalgaon news)

तेव्हा साक्षी मनोज नरवाडे ही युवती माझा भाऊ नीलेशकडे पाहून मोठमोठ्याने शिवीगाळ करत होती. माझे वडील तिला समजावण्यासाठी गेले असता तिने वडिलांना लाथ मारली. हा गोंगाट ऐकून परिसरातील लोक जमले. मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला असता तिने मलाही, तुला मारून टाकेन असे म्हणत धमकावले.

भाऊ नीलेशजवळ जात ‘तू माझ्याशी लग्न कर नाहीतर मी तुला जिवंत सोडणार नाही’, असे दरडावत तिने जवळ असलेला चाकू नीलेशच्या मानेवर, हातावर वार केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नीलेश रक्तबंबाळ झाल्याने वडिलांनी पोलिसांना कळवले. पोलिस गाडीचा आवाज ऐकून साक्षी नरवाडे ही पळून गेली.

जखमी नीलेशला प्रथम ग्रामीण रुग्णालयात व नंतर विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या तक्रारीवरून पोलिसांनी साक्षी नरवाडेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडला असल्याची चर्चा कानी पडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident: कोल्हापुरातील रस्त्यावर घडला 'कॅरम बोर्ड'सारखा थरार! भरधाव कारनं दुचाकींना उडवलं, तिघांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Market Cap: सेन्सेक्स ऐतिहासिक उच्चांकावर; बीएसई कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 14 लाख कोटींची भर

Wayanad Lok Sabha Election Results: काँग्रेससाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वायनाडमध्ये राहुल गांधींना धक्का?

"BJP ने आपल्याच समर्थकांना हिंसक बनवले," माजी मुख्यमंत्र्याच्या धक्कादायक आरोपांमुळे देशभरात खळबळ

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल नागपूरच्या निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT