Crime esakal
जळगाव

Jalgaon Crime: धमकी दिल्याने युवकाची आत्महत्या; 2 महिलांसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime : तालुक्यातील चितोडा येथील २३ वर्षीय युवकास, दोन महिलांसह पाच जणांनी चापटा बुक्क्यांनी मारहाण करत व गावातून निघून जा, अशी धमकी दिल्याने युवकाने घाबरून जाऊन यावल शेतशिवारातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची फिर्याद मृत युवकाच्या वडिलांनी येथील पोलिस ठाण्यात दिल्यावरून दोन महिलांसह पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Youth commits suicide due to threat case registered against 5 people including 2 women Jalgaon Crime)

तालुक्यातील चितोडा येथील दुर्गेश संतोष किनगे (वय २३) यास गावातील दोन महिलांसह भास्कर आनंदा जंगले, भूषण भास्कर जंगले, ज्ञानेश्वर भास्कर जंगले यांनी गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास संतोष यास चापटाबुक्क्यांनी मारहाण करत गावातून निघून जा, अशी धमकी दिल्याने युवकाने घाबरून जात येथील एका शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

प्रथम गुरुवारी दुपारी पोलिस पाटील पंकज वारके यांच्या माहितीवरून पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

तर रात्री उशिरा वडील संतोष किनगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन महिलांसह पाच संशयितांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अविनाश दहिफळे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT