Suicide 
जळगाव

Jalgaon Crime : मेहुण्याच्या मुलीच्या लग्नाहुन परतला अन् घरी येऊन विष प्राशन केलं; रुग्णालयात...

सकाळ वृत्तसेवा

जळगाव - खेडी कढोली(ता.एरंडोल) येथील ३५ वर्षीय तरूणाने राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी ४ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.

अंत्यवस्थ तरुणाला जळगावला हलवण्यात आले मात्र, त्याचे प्राण वाचु शकले नाहीत. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. ज्ञानेश्वर रमेश कोळी (वय-३५) रा. खेडी कढोली, ता.एरंडोल असे मृत तरूणाचे नाव आहे

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, ज्ञानेश्वर कोळी हा आपल्या पत्नी व दोन मुलांसह एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली येथे वास्तव्याला होता.

शेतमजूरीचे काम करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाहर करीत होता. ज्ञानेश्वर कोळी यांच्या साल्याच्या मुलीचे लग्न असल्याने पत्नी अनिता आणि दोन्ही मुलांसह अमळनेर येथे लग्नासाठी बुधवार(ता. ३) रोजी सकाळी ९ वाजता गेले होते.

दुपारी ज्ञानेश्वर कोळी हा अमळनेर येथून खेडी कढोली येथे आला. त्यावेळी त्यांची पत्नी व दोन्ही मुले ही अमळनेरला थांबलेली होती. रात्री ९ वाजता घरी आल्याचे ग्रामस्थांनी त्याला पाहिले होते. मात्र मध्यरात्री ज्ञानेश्वर कोळी याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली.

हा प्रकार आज सकाळी ७ वाजता लक्षात आला. शेजारी आणि ग्रामस्थांनी तातडीने जळगाव जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले.

आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. यावेळी जिल्हा शासकीय रूग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT