Drown esakal
जळगाव

Jalgaon : तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या नितीन दीपक राठोड (वय २२, रा. कुसुंबा) याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. ८) घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

कुसुंबा (ता. जळगाव) येथील नितीन राठोड येथे वास्तव्यास असून, तो मजुरी करून कुटुंबाला हातभार लावत होता. शनिवारी सकाळी नितीन लहान मुलाला घेऊन गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेला.

पाण्यात उतरल्यानंतर त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. प्रत्यक्षदर्शी तरुणाने आरडाओरड केल्यावर काही तरुणांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत नितीनचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.(Youth drowned in lake Jalgaon News)

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी गणेश शिरसाळे, नारसिंग पाडवी व योगेश बारी घटनास्थळी पोचले. पोलिसांनी गावातील पट्टीच्या पोहणाऱ्यांना पाचारण करुरून त्यांच्या मदतीने नितीनचा मृतदेह बाहेर काढला.

त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. या वेळी नातेवाइकांनी प्रचंड गर्दी केली होती. एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली. त्याच्यामागे आई, वडील व लहान भाऊ असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात आज जोरदार पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी; तुमच्या भागात कसे असेल हवामान? जाणून घ्या

Maratha Reservation: समाजापासून मला दूर ठेवण्याचा सरकारचा कट; माढ्यातील इशारा सभेत मनोज जरांगे यांचा आरोप, आरक्षणाचा लढा सुरूच राहणार

अर्थभान : इमर्जिंग अर्थव्यवस्थांमध्ये भारत अव्वल

शाळांना यंदा ११ दिवस दिवाळी सुट्टी! शैक्षणिक वर्षात २३७ दिवस अध्यापनाचे अन्‌ शिक्षकांना १२८ दिवस सुट्ट्या; यंदा वार्षिक परीक्षा एप्रिलअखेर, वाचा...

Jharkhand Protest: झारखंडमध्ये भरती परीक्षांवरून आंदोलन पेटले; विद्यार्थी संघटना सीबीआय चौकशीच्या मागणीवर ठाम

SCROLL FOR NEXT