Accident News esakal
जळगाव

Jalgaon : Mahendra Marshallची दुचाकीस धडक जळगाव येथील युवक ठार

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : येथील वन विभागाच्या तपासणी नाक्याजवळ भरधाव जाणाऱ्या चारचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीस जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात शुभम मिस्तरी (वय ३५, जि. जळगाव) याचा जागेवरच मृत्यू झाला.

जळगाव येथील आकाश नाथ आणि शुभम मिस्तरी (रा. वाघनगर, जळगाव) हे दोघे शनिवारी (ता. १२) पाल येथून दुचाकीने (एमएच १९ सीएम ८९०८) जळगावकडे निघाले होते.

दरम्यान, वन विभागाच्या तपासणी नाक्याजवळ चारला समोरून येणाऱ्या चारचाकी (क्रमांक एमएच १९, क्यू ५५१) चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने दुचाकीस समोरून जोराची धडक दिली. (Youth from Jalgaon killed in Mahindra Marshal Four Wheeler Attack on two wheeler Jalgaon News)

धडकेत शुभम मिस्तरी याचा जागीच मृत्यू झाला. तर आकाश नाथ हा गंभीर जखमी आहे. घटनेनंतर जीपचालक घटनास्थळावरून पसार झाला.

अपघाताची माहिती मिळताच पाल ठाण्याचे पोलिस कर्मचारी कल्पेश अमोदकर, प्रदीप सपकाळे, संजीव मेढे, रुबाब तडवी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्जमाफीसाठी अजून थोडं थांबा! शेतकऱ्यांना दिलासा, पण प्रतीक्षा कायम; बावनकुळेंनी सांगितलं विलंबाचं खरं कारण

निर्मिती यांनी मकरंद अनासपुरेंकडून गिरवले मराठवाडी बोलीचे धडे ! सुपर डुपर सिनेमासाठी अभिनेत्रीची मेहनत

Crime: मैत्रिणीसोबत शरीरसंबंधाची मागणी, अश्लील व्हिडिओ पाठवून छळ अन्... पत्नीकडून त्रास, पती कंटाळला अन्...; काय घडलं?

Latest Marathi News Live Update : भर पावसात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विविध समस्यांबाबतआंदोलन

"लग्न कधी करणार ?" चाहत्याच्या प्रश्नावर प्राजक्ता माळीचं भन्नाट उत्तर ! "आई-बाबा.."

SCROLL FOR NEXT