Bail Granted  esakal
जळगाव

Jalgaon News : नालासोपारा स्फोटके प्रकरणी तरुणास साडेचार वर्षानंतर जामीन

सकाळ वृत्तसेवा

यावल (जि. जळगाव ) : नालासोपारा स्फोटके प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील साकळी (ता. यावल) येथील विजय ऊर्फ भय्या उखर्डू लोधी या तरुणास सप्टेंबर २०१८ मध्ये राज्याच्या दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने साकळी येथून अटक (Arrested) केली होती. (Youth granted bail after 4 and half years in Nalasopara explosive case jalgaon news)

तेव्हापासून लोधी हा तरुण तुरूंगात होता. या तरुणास मुंबई विशेष न्यायालयाने २१ मार्चला जामीन मंजूर केला आहे. तब्बल साडेचार वर्षांनी तरुणास जामीन मिळाला आहे.

नालासोपारा येथे १० ऑगस्ट २०१८ ला एटीएसने कारवाई करून २० जिवंत बॉम्ब व बॉम्ब बनविण्याचे साहित्य जप्त करीत वैभव सुभाष राऊत यास अटक केली होती. तो सनातनचा साधक होता. त्या नंतर राज्यभरात धाडसत्रात या स्फोटक प्रकरणात वैभव राऊतसह शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर व अविनाश पवार यांना अटक करण्यात आली होती

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

तर यात ६ सप्टेंबरला साकळी (ता. यावल) येथील वासुदेव भगवान सूर्यवंशी यास व ७ सप्टेंबरला गावातील लोधीवाड्यातील विजय ऊर्फ भय्या उखर्डू लोधी या दोघांना अटक केली होती. या संशयितांवर मुंबई, नालासोपारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर येथे घातपाती कारवाया, बॉम्बस्फोट, विशिष्ट विचारसणीचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींच्या हत्या घडवण्याचा कट असे आरोप होते व तेव्हापासून साकळी गावातील दोघे तुरूंगात होते तर यातील विजय ऊर्फ भय्या उखर्डू लोधी याने मुंबईच्या विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. विशेष न्यायालयाने ५० हजारांच्या ऐपतीचा दाखल्यावर जामीन मंजूर केला आहे. संशयिताकडून ॲड. संजीव पुनाळेकर, ॲड. रणजित नायर आणि ॲड. सचिन कणसे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT