yuvaranga Excellent meal Esakal
जळगाव

Yuvaranga Festival : महाकाय भटारखाना ठरतोय लक्षवेधी!

सकाळ वृत्तसेवा

फैजपूर (जि. जळगाव) : युवारंग महोत्सवात विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी तीन स्वतंत्र कक्ष (Room) बनविण्यात आले आहेत. मुलांचा, मुलींचा आणि संघप्रमुख, असे तीन कक्ष आहेत. (Yuvaranga Festival student artistes chief guest getting excellent food jalgaon news)

विशेष म्हणजे, यात सर्वच आलेल्या प्रमुख पाहुण्यांसह मुलांचा, मुलींचा आणि संघप्रमुख या सर्वांचा भोजनाचा एकच मेनू दिला जात आहे. धनाजी नाना विद्यालयाच्या भव्य प्रांगणावर दीड हजार स्क्वेअर फूट जागेवर भोजन कक्षाचे पेंडॉल टाकण्यात आले आहे.

सकाळी नाश्ता, दुपारचे व सायंकाळचे भोजन तयार झाल्यापासून तर सर्वांचे जेवण होईपर्यंत प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली भोजन समिती चेअरमन तथा उपप्राचार्य विलास बोरोले यांच्यासह समितीमधील एकूण २५ लोक लक्ष देऊन काम करीत आहेत.

असा आहे मेनू...
विद्यार्थ्यांचे आगमन झाल्यानंतर सायंकाळी मसाला खिचडी, कढी, बटाटा, रस्सी, चपाती, सलाड, दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता आणि दुपारी मटर-पनीर, मसाला भाजी, बटाटा सुकी भाजी, चपाती, पुरी, मसालेभात, पापड, कांदा, सायंकाळी छोले-पुरी, कढी पुलाव, कांदा-लिंबू, सलाड, गुलाबजाम,

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

तर शनिवारी (ता. ११) सकाळी नाश्ता, दुपारी चवळीची पातळ भाजी, भेंडी मसाला, व्हेज पुलाव, चपाती, पापड, सलाड, मैसूरपाक, सायंकाळी भरीत पुरी, भाकरी, कोशिंबीर, तळलेली मिरची, सलाड असे अत्यंत स्वादिष्ट जेवण विद्यार्थ्यांना मिळत आहे. रविवारी (ता. १२) सकाळी नाश्ता, दुपारचे जेवण चना मसाला, मिक्स व्हेज, दाल तडका, भात, चपाती, पुरी, पापड, जिलबी, सायंकाळी पावभाजी, पुलाव, गरम सुजी हलवा असा मेनू असेल.

"प्राचार्य व जेवण समितीमधील सर्वच सदस्य सकाळचा नाश्ता, दुपारचे व सायंकाळच्या भोजनाची उत्कृष्ट सेवा देत आहेत. विद्यापीठस्तरीय आलेल्या तिन्ही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांच्या जेवणाची काळजी घेत आहेत." - विलास बोरोले, उपप्राचार्य तथा युवारंग भोजन समिती, अध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jackie Shroff: भिडू ये है बिझनेस! जग्गूदादाच्या बायकोने कसे केले 1 लाखाचे 100 कोटी? जाणून घ्या A टू Z स्टोरी

धोनीचा 'Beast' मोड, ७५ लाखांची गाडी चालवताना दाखवून दिलं आर्मीप्रेम....तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO

५ मिनिटाच्या रस्त्यासाठी अर्धा तास! राज ठाकरेंना अनुभवावं लागलं पुण्याचं ट्रॅफिक... रोज कोंडीत अडकणाऱ्या पुणेकरांच्या मनस्तापात भर

Car Prices: फक्त काही दिवस थांबा! गाड्या 1.5 लाखांनी स्वस्त होणार? काय आहे कारण?

Ganesh Chaturthi 2025 : भाद्रपद महिना 'या' राशींसाठी घेऊन येणार मोठा ट्विस्ट, बाप्पाच्या येण्याने होणार संकटांचा विनाश

SCROLL FOR NEXT