Zero death rate corona day district
Zero death rate corona day district sakal
जळगाव

दिलासा... धुळे जिल्हा तूर्त कोरोनामुक्त!

सकाळ वृत्तसेवा

धुळे : कोरोना संकटामुळे गेल्या दीड-दोन वर्षांपासून अक्षरशः हैराण झालेल्या जिल्हावासीयांसाठी सोमवार (ता. ७)चा दिवस आनंदाचा ठरला. शहरासह जिल्ह्यात सोमवारी एकही कोरोनाबाधित आढळला नाही, पण जिल्हाभरात कोरोनाचा एकही सक्रिय रुग्ण नसल्याचेही समोर आले. त्यामुळे एका अर्थाने आजघडीला धुळे जिल्हा कोरोनामुक्त झाला. अर्थात शासकीय यंत्रणेकडे उपलब्ध माहिती व आकडेवारीच्या आधारावर हे चित्र आहे. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाची क्लीष्टता पाहता शास्त्रीयदृष्ट्या असे म्हणणे चुकीचे ठरेल. असे असले तरी कागदावर आलेला शून्य आकडा निश्‍चितच आनंद देणारा म्हणावा लागेल.

धुळे शहर व जिल्ह्यात १० एप्रिल २०२० ला कोरोनाचा पहिला बाधित आढळला होता.यानंतर कोरोना विषाणूने जिल्हाभरात पाय पसरून हैराण केले. कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेने थैमान घातले. कोरोनाची तिसरी लाटही थैमान घालेल, अशी शक्यता होती. सुदैवाने उपाययोजना व लसीकरणामुळे हे संकट टळल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या लाटेतील कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने अनेकांचा जीव घेतला. तिसऱ्या लाटेतील ओमिक्रॉन व्हेरिएंट मात्र जीवघेणा ठरला नाही.

चारही तालुके कोरोनामुक्त

काही दिवसांपासून कोरोनाचे संकट कमी व्हायला सुरवात झाली. त्याचा पहिला दिलासा धुळे तालुक्याला मिळाला. तालुक्यात कोरोनाचा एकही सक्रिय रुग्ण नसल्याने धुळे तालुका कोरोनामुक्त झाला. रविवारी (ता. ६) जिल्ह्यात केवळ दोनच सक्रिय रुग्ण होते. त्यामुळे कोरोनामुक्तीच्या आशा पल्लवीत झाल्या आणि अखेर सोमवारी ही अपेक्षाही पूर्ण झाली. धुळे शहरासह जिल्ह्यातील चारही तालुके कोरोनामुक्त झाल्याचे चित्र समोर आले. अर्थात कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेतही अशी स्थिती आली होती.

दृश्‍य दिलासा, अदृश्‍य धोका

आजघडीला उपलब्ध माहितीच्या आधारे जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित नाही, याचा दिलासा असला तरी कोरोनाचे संकट मोठे विचित्र असल्याने कुठे बाधित असेल हे सांगता येत नाही. शिवाय रोज हजारो नागरिक एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात येत-जात असतात. एवढेच नव्हे, तर परदेशातून अनेक जण दररोज जिल्ह्यात येतात. त्यामुळे कोण बाधित असेल आणि त्यातून पुढे कुणाला संसर्ग होईल हे सांगता येत नाही. तसेच अद्याप जिल्ह्यातील ७३ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. त्यातीलच कुणी पॉझिटिव्ह निघाला, तर उद्याच कोरोनामुक्तीचा शिक्का पुसला जाईल. त्यामुळे हा अदृश्‍य धोका कायम आहे.

जिल्ह्यातील स्थिती अशी

  • एकूण बळी ६७४

  • एकूण बाधित ५०७३५

  • सोमवारी बाधित ०

  • सक्रिय रुग्ण ०

  • प्रलंबित अहवाल ७३

लसीकरणाची स्थिती अशी

  • अपेक्षित लाभार्थी १८,२४,३४७

  • पहिला डोस १४,३१,८६१

  • दुसरा डोस ११,२२,७६७

''सोमवारी जिल्ह्यात कोरोनाचा एकही सक्रिय रुग्ण नाही. मात्र, जिल्हा कोरोनामुक्त झाला किंवा अशीच स्थिती राहील का हे सांगता येणार नाही. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट मात्र तुलनेने तेवढी घातक ठरली नाही. उपाययोजना, नागरिकांचे सहकार्य आणि प्रामुख्याने लसीकरणामुळे हा धोका टाळण्यास मोठी मदत झाली. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी यापुढेही आवश्‍यक काळजी घेणे, लसीकरण पूर्ण करणे तेवढेच गरजेचे आहे.''

-डॉ. विशाल पाटील, कोरोना नोडल अधिकारी, धुळे जिल्हा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT