Apple Layoffs Sakal
Jobs

Apple layoffs: आता अ‍ॅपलकडूनही कर्मचाऱ्यांना नारळ! गुगल, अ‍ॅमेझॉन, मेटानंतर मोठा झटका

कुठल्या विभागात आणि किती कर्मचारी कपात होईल जाणून घ्या

Amit Ujagare (अमित उजागरे)

Apple layoffs: गेल्या काही महिन्यांपासून जागतीक मंदीची चर्चा सुरु आहे, पण प्रत्यक्षात तशा अधिकृत नोंदी दिसत नाहीत. पण कदाचित याचाच परिणाम म्हणून की काय अनेक बड्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. यामध्ये गुगल, अॅमेझॉन फेसबुकची मदर कंपनी मेटा यांच्यानंतर आता आयफोन बनवणारी कंपनी अॅपलनंही कर्मचारी कपातीला सुरुवात केली आहे. ब्लुमबर्ग न्यूजनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Apple layoffs after Google Amazon Meta iPhone maker may start)

ब्लुमबर्गच्या अहवालासनुसार, अॅपलच्या कर्मचारी कपातीच्या निर्णयाचा फटका कंपनीच्या डेव्हलपमेंट आणि प्रिझर्व्हेशन टीमला बसणार आहे. पण नेमकी किती कर्मचारी कपात होणार आहे, याचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. त्याचबरोबर बिझनेस इनसाईडरने देखील हा दावा केला आहे की, अॅपलनं कर्मचाऱ्यांना पुन्हा अॅप्लाय करायला सांगितलं आहे अन्य़था त्यांची हाकालपट्टी केली जाईल. या कर्मचारी कपातीचा फटका अॅपलच्या रिटेल स्टोअर्स आणि इतर सुविधा केंद्रांतील कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महागाई वाढल्यानं व्याजाचे दर वाढले आहेत त्यामुळेच जगभरात सध्या आर्थिक मंदीची स्थिती असल्याच्या बातम्या यापूर्वीच आल्या आहेत. याचा फटका अनेक बड्या टेक कंपन्यांना बसला आहे. यामध्ये फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटानं दोन टप्प्यात कर्मचारी कपात केली. पहिल्या टप्प्यात ११,००० त्यानंतर त्यानंतर १०,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकलं होतं.

हे ही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

तसेच गुगलने गेल्यावर्षी आपल्या १२,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकलं होतं. कंपनीची आर्थिक परिस्थिती अधिक बिकट होण्यापूर्वीच हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. त्याचबरोबर अॅमेझॉननं २७,००० कर्मचाऱ्यांची दोन टप्प्यात कपात केली होती. पहिल्या टप्प्यात १८,००० कर्मचारी तर दुसऱ्या टप्प्यात ९,००० कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

Gorakhpur Mumbai Train Bomb Threat : गोरखपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये बॉम्बची धमकी; प्रवशांमध्ये खळबळ अन् शोधमोहीम सुरू

SCROLL FOR NEXT