Microsoft News Updates |Microsoft announces job cuts
Microsoft News Updates |Microsoft announces job cuts esakal
Jobs

Microsoft Layoffs: मायक्रोसॉफ्टही करणार कर्मचारी कपात; 10,000 एम्प्लॉईज होणार बेरोजगार

Amit Ujagare (अमित उजागरे)

Microsoft Layoffs : मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशननं देखील कर्मचारी कपातीच्या लाटेत उडी घेतली आहे. ताज्या माहितीनुसार, कंपनी ५ टक्के कर्मचारी कपातीचा विचार करत आहे. युकेस्थित स्काय न्यूजनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Microsoft cuts about 10000 jobs less than 5 per cent of global workforce)

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, ताज्या निर्णयानुसार कंपनी इंजिनिअरिंग डिव्हिजनमधील कर्मचारी कपातीचा विचार करत आहे. कंपनीच्या प्रॉडक्टसच्या मागणीतील घट आणि अर्थव्यवस्थेत होत असलेली घसरण यापार्श्वभूमीवर हा कर्मचारी कपातीचा विचार सुरु असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.

ऑक्टोबर महिन्यात मायक्रोसॉफ्टनं विविध विभागातील १००० कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता. यामुळं कंपनीच्या २ लोखांहून अधिक कर्मचाऱ्यांपैकी याचा १ टक्के सॉफ्टवेअर इंजिनिअर्सच्या रोजगारावर परिणाम झाला होता. मायक्रोसॉफ्टचे २,२१,००० फुलटाईम कर्मचारी आहेत. यांपैकी १,२२,००० कर्मचारी अमेरिकेतून काम करतात तर उर्वरित ९९,००० कर्मचारी इतर देशांमधून काम करतात.

हेही वाचा : दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

२०२३ या नव्या वर्षात गेल्या दोन आठवड्यात जगभरातील तब्बल ३०,००० कर्मचाऱ्यांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या सहा दिवसात ३० कंपन्यांमधील ३०,६११ कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. यामध्ये अॅमेझॉन, फेसबूक या बड्या कंपन्यांचाही समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT