Eggs Shortage: बाबो..! कोंबड्यांनाही भरली थंडी, गायब झाली अंडी; दिवसाला एक कोटी अंड्यांचं 'शॉर्टेज'

महाराष्ट्रात दिवसाला कोट्यवधी अंड्यांची आवश्यकता भासते.
eggs
eggs

औरंगाबाद : महाराष्ट्रात सध्या अंड्यांचा मोठा तुटवडा असून त्यामुळं नागरिकांची अंडी खाण्याची गरज पूर्ण होऊ शकत नाहीए. पशुसंवर्धन विभागानं याची माहिती दिली असून यासंदर्भात उत्पादन वाढवण्याचे निर्देष पोल्टी फार्म्सना दिले आहेत. (Maharashtra facing shortage of 1 crore eggs per day says Official)

eggs
Brij Bhushan Singh: ...तोपर्यंत एकही खेळाडू स्पर्धा खेळणार नाही; महिला कुस्तीपटू आक्रमक

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सध्या दिवसाला २.२५ कोटी अंड्यांची गरज भासते. पण सध्या ही गरज पूर्ण करण्यात पशुसंवर्धन विभाग अपयशी ठरला आहे. त्यामुळं अंड्यांचं उत्पादन वाढवण्याच्या सूचना पोर्ल्ट्री फार्मसना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय पारकाले यांनी दिली आहे.

eggs
Brij bhushan Singh: लैंगिक शोषणाच्या आरोपांवर बृजभूषण सिंहांनी मांडली बाजू; म्हणाले, मी कारवाई...

सध्या महाराष्ट्रातील अंड्यांचा तुटवडा भरुन काढण्यासाठी कर्नाटक, तेलंगाणा आणि तामिळनाडू या राज्यांतून अंड्यांची आवक करत आहोत. अंड्यांचा तुटवडा निर्माण झाल्यानं अंड्यांच्या दरातही वाढ झाली आहे. त्यातच हिवाळा असल्यानं लोकांकडून अंडी खाण्याच प्रमाण वाढलं आहे.

eggs
Brij Bushan Singh : बृजभूषण सिंहांवर यापूर्वी 11 गुन्हे, पैकी ४ गंभीर; जाणून घ्या राजकीय प्रवास

अंड्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी पशुसंवर्धन विभागानं प्रत्येक जिल्ह्याला 21,000 रुपयांच्या अनुदानित दरानं 50 व्हाईट लेघॉर्न कोंबड्या आणि 1,000 पिंजरे देण्याची योजना आखली आहे. विभागाने पुढील मंजुरीसाठी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा : दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

औरंगाबादमध्ये 100 अंड्यांची किंमत 575 रुपये आहे. दोन महिन्यांहून अधिक काळापासून या किंमती 500 रुपयांच्या (100 अंडी) वर आहेत," अशी माहिती घाऊक व्यापारी अब्दुल वाहिद शाह यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com