काही सुखद

चिमण्यांसाठी दीडशे मातीभांडी ठेवून दाणापाण्याची व्यवस्था

सकाळवृत्तसेवा

मालेगाव कॅम्प - जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून बुधवारी (ता. २०) तळवाडे (ता. मालेगाव) येथील भामेश्‍वर युवा मित्रमंडळाच्या सदस्यांनी चिमण्या-पाखरांसाठी गाव परिसरातील झाडांवर १५० मातीची भांडी ठेवून दाणापाण्याची व्यवस्था केली.

पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेत या ध्येयवेड्या युवकांनी पदरमोड करून गाव परिसरात हजाराच्यावर वृक्षांची लागवड करीत त्यांचे संवर्धन केले आहे. याच झाडांवर मातीची भांडी ठेवून पक्ष्यांच्या दाणापाण्याची व्यवस्था केल्याने पक्षी-प्राणिमात्रांवर प्रेम करून भूतदया जोपासण्याचा वस्तुपाठ नव्या पिढीसाठी समोर ठेवल्याने सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

या उपक्रमात भामेश्‍वर युवा मित्रमंडळाचे सल्लागार शिवदास निकम, अध्यक्ष अमोल देशमुख, उपाध्यक्ष हिरामण पगार, सरचिटणीस मल्हारी भोसले, सुनील अहिरे, शांताराम पवार, संभा जाधव, किशोर सोनवणे, सचिन अहिरे, भाऊसाहेब पवार, दौलत जाधव, ज्ञानेश्‍वर अहिरे, शरद साळुंके आदींनी संयोजन केले.

‘मरणासन्न अवस्थेतील घोड्याला जीवदान’
काही दिवसांपूर्वी तळवाडेत मेंढपाळांचा वाडा आला होता. त्यांचा घोडा रात्रीच्या अंधारात वाट चुकून दुर्दैवाने विहिरीत पडला. घोड्याला  नागरिकांनी विहिरीतून बाहेर काढले. जखमी अवस्थेतील घोडा भामेश्‍वर युवा मित्रमंडळाच्या सदस्यांच्या दृष्टीस पडला. घोड्याला ताब्यात घेऊन मेंढपाळांचा शोध घेतला. मेंढपाळांचा शोध न लागल्याने त्याच्यावर मलमपट्टी करून स्मशानभूमीतील बंदिस्त कम्पाउंडमध्ये सदस्यांनी त्याच्या चाऱ्यापाण्याची व्यवस्था केली. कुटुंबातील सदस्याप्रमाणे मंडळाने घोड्याची तब्बल चार महिने निगा राखत सांभाळले. घोडा चांगला झाल्यावर मेंढपाळांचा शोध घेऊन घोडा त्यांच्याकडे सुखरूप सोपविण्यात आला.

यांत्रिकीकरणामुळे चिमण्या-पाखरांची संख्या कमी झाली आहे. पुनश्‍च पाखरांचा चिवचिवाट वाढावा या हेतूने पक्ष्यांच्या दाणापाण्याची व्यवस्था करत कायमस्वरूपी निसर्गाचे संवर्धन करण्याचा संकल्प सोडला आहे.
-शिवदास निकम, सल्लागार, भामेश्‍वर मंडळ, तळवाडे

काही सुखद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT