काही सुखद

सौरऊर्जेद्वारे स्वतःसह कंपनीलाही वीज

सकाळवृत्तसेवा

नाणेकरवाडीतील शेतकऱ्याने भरमसाट वीज बिलाला वैतागून उभारला प्रकल्प

चाकण - नाणेकरवाडी (ता. खेड) येथील दिनकर नाणेकर या शेतकऱ्याने वीज बिल अधिक येत असल्याच्या कारणाला वैतागून त्याच्या स्वतःच्या इमारतीच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारला व त्यासोबत सोलर नेट मिटरिंग हे उपकरणही बसवले. यासाठी त्यांना आठ लाख रुपये खर्च आला. या प्रकल्पामुळे अठ्ठावन्न खोल्यांना वीज मिळत असून, एक वीजपंपही सुरू आहे. बिलाची बचत होऊन कंपनीलाही वीजपुरवठा होत आहे, अशी माहिती दिनकर नाणेकर यांनी दिली.

दिनकर नाणेकर यांनी त्यांच्या चार मजली इमारतीत अठ्ठावन्न भाड्याच्या खोल्या बांधल्या आहेत. या खोल्यांचे दोन महिन्यांना हजारो रुपयांचे बिल येत होते. बिल भरले नाही, तर ते लाखो रुपयांवर जायचे. त्यामुळे वैतागून त्यांनी सौर ऊर्जा प्रकल्प उभारून त्यासोबत सोलर नेट मीटरिंग उपकरण बसवायचे असे ठरविले. इमारतीच्या छतावर सोलर पॅनेल व इतर साहित्य बसविण्यात आले. ऊन अधिक असेल, तर अधिक युनिट वीज मिळते. त्यांनी या प्रकल्पासाठी वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांची परवानगी घेतली आहे.

आता कंपनीलाही वीज मिळत आहे. त्यामुळे जेवढी वीज मिळते तेवढी कंपनी घेते. त्यांच्या बिलातून ही रक्कम वजा केली जाते. शिवाय सोलर नेट मिटरिंगमुळे कंपनीला किती वीज मिळाली व नाणेकर यांनी किती वापरली हेही कळत आहे, असे वीज कंपनीचे सहायक अभियंता मदन मुळूक यांनी सांगितले. 
 

दहा किलोवॉट क्षमतेचा प्रकल्प
दोन महिन्यांपासून हा प्रकल्प सुरू केला असून, याची क्षमता दहा किलोवॉटइतकी आहे. वीजपंप व अठ्ठावन्न खोल्यांचे येणारे भरमसाट वीज बिल भरून मी थकलो होतो. आता हा आठ लाख रुपयांचा प्रकल्प राबविल्याने मला तर वीज वापरायला मिळतेच, शिवाय अधिकची वीज मी कंपनीलाही पुरवतो. या प्रकल्पामुळे वीजपुरवठा सुरळीत होत आहे, असे नाणेकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Empress Garden : एम्प्रेस गार्डनच्या जागेवर न्यायालयीन बांधकामास विरोध; १३४ वर्षांचा ऐतिहासिक वारसा उद्ध्वस्त करण्याचा डाव

Gyanesh Kumar Impeachment : मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवण्याची तयारी! ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? विरोधी पक्ष संसदेत मांडणार प्रस्ताव!

IND vs WI, Live Streaming: भारत-वेस्ट इंडिज संघात ३ वनडे अन् ५ टी२० सामन्यांचा रोमांच! कधी, कुठे अन् किती वाजता पाहाणार मॅच?

SCROLL FOR NEXT