काही सुखद

कोरोना निवारणार्थ माणच्या एमआयडीसीची लाख माेलाची मदत

विशाल गुंजवटे

बिजवडी (जि. सातारा) : माण तालुक्‍यातील कोरोना निवारणासाठी माण तालुक्‍याचे सुपुत्र आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून व विविध कंपन्यांच्या सहकार्याने मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या महिन्यात त्यांनी पियाजो कंपनीच्या सहकार्यातून तालुक्‍याला आठ लाख 50 हजार रुपये किमतीची पीपीई किट स्वरूपात मदत केली होती, तर आता दुसऱ्यांदा सात लाख 50 हजार रुपये किमतीची साहित्यरूपी मदत पाठवून दिली आहे.
 
तालुक्‍यात म्हसवड, हिंगणी परिसरात लवकरच औद्योगिक वसाहत उभारण्यात येणार असून, कोरोनाच्या लढ्यात येथील जनतेला औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून काही तरी मदत मिळावी, यासाठी अविनाश सुभेदार व त्यांचे बंधू शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांची कायम धडपड होती. औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून सुरवातीला पीपीई किट व इतर साहित्य दिल्यानंतर आता दुसऱ्यांदा तालुक्‍यातील कोरोना निवारणासाठी सात लाख 50 हजार रुपये किमतीचे थर्मामीटर, स्टीमर, पल्स ऑक्‍सीमीटर आदी साहित्याची मदत पाठवून दिली आहे.

Video : सार्वजनीक बांधकाम विभाग जबाबदारीने वागेल का ? वडूजकरांचा सवाल
 
त्यांचे बंधू अनिल सुभेदार यांनी ही मदत तहसीलदार चंद्रशेखर सानप यांच्याकडे सुपूर्द केली. या वेळी सुनील पोळ, बाळासाहेब सावंत, मनोज पोळ, दिदी ताथवडेकर, ऋत्विक सुभेदार, संकेत सुभेदार उपस्थित होते. तालुक्‍यासाठी देण्यात आलेल्या साहित्यरूपी मदतीमुळे कोरोना रोगाचा सामना करताना ते उपयुक्त होणार असून, या मदतीबद्दल माण प्रशासनाने सुभेदार बंधूंबरोबर, औद्योगिक वसाहत, पियाजो कंपनी, अधिकाऱ्यांचे आभार मानले.
 

कोरोनाने सर्वत्र थैमान घातलेले असताना त्याचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी, तसेच त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासनस्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सामाजिक बांधिलकी जपत औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध कंपन्यांच्या सहकार्याने आपल्या माण तालुक्‍याला साहित्यरूपी मदत करत आहोत. या लढ्यात औद्योगिक विकास महामंडळ तुमच्याबरोबर असून, अजूनही मदत करण्यासाठी प्रयत्न करू

- अविनाश सुभेदार, सहमुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई


Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT