काही सुखद

ऐकू येत नसूनही चुकत नाही त्यांचा ठेका 

- नीला शर्मा

कर्णबधिर असूनही त्या मुली ठेक्‍याशी उत्तम प्रकारे जुळवून घेत नृत्याचा मनसोक्त आनंद घेतात. त्यांचं परस्परांशी असलेलं सामंजस्य विलक्षण आहे. 

पुण्यातील रेड क्रॉस संस्थेतील कर्णबधिर मुली कथकसारख्या शास्त्रीय नृत्यात रमतात. ऐकू येत नसलं तरी ठेक्‍यातला त्यांचा बिनचूकपणा वाखाणण्याजोगा असतो. त्यांना पंधरा वर्षांपासून विनामूल्य प्रशिक्षण देणाऱ्या शिल्पा दातार आपल्या या विद्यार्थिनींचं कौशल्य पाहून धन्यता व्यक्त करतात. 

शिल्पाताईंची मुलगी गार्गी पाचवीत असल्यापासून या मुलींच्या प्रशिक्षणात सहभागी होत राहिली आहे. "आईकडून स्वत: घेतलेले धडे कर्णबधिर मैत्रिणींना शिकवताना आणखी पक्के होत गेले,' असं ती नमूद करते. सात वर्षांच्या सहवासानंतर ती आता मुंबईत पुढील शिक्षणासाठी असते. वेळ मिळेल तेव्हा ती इथं आली, की हमखास या मैत्रिणींना भेटायला जाते. त्यांनी गिरवलेले नवे पाठ कोणते, ते त्यांच्याचकडून जाणून घ्यायची मोठी उत्सुकता तिला असते. अलीकडेच दिवाळीच्या सुटीत झालेल्या एका कार्यक्रमात गार्गीनं त्यांची प्रगती पाहून आनंद व्यक्त केला. 
सामाजिक कार्याची आवड असल्यानं गार्गीनं अकरावीत असताना तीस कर्णबधिर मुलांच्या शारीरिक- मानसिक आरोग्यविकासासाठी महिन्याभराचा एक प्रकल्प हाती घेतला होता. त्यासाठी त्यांना पौष्टिक खाऊ रोज दिला. नाट्य व नृत्याचा समावेश असलेला कृतिकार्यक्रम घेतला, त्यामुळे तर तिची गट्टी या मुलींशी जास्तच जमली. 

ऐकता- बोलता येत नसल्यानं विचार व भावना व्यक्त करण्यात मागं पडणाऱ्या मुली कृतिकार्यक्रमामुळे खुलू लागल्या. नेहमीच्या हस्तलिपीला आता कथक नृत्यात वापरल्या जाणाऱ्या मुद्रा व हस्तकांची जोड मिळाली. कलात्मक अभिव्यक्ती साधू लागल्यानं आत्मविश्वास वाढला. 
या साऱ्या मैत्रिणी आपापसांत मस्त गप्पा करतात. नृत्य करताना ठेका त्यांना ऐकू येत नाही; पण मार्गदर्शक ताईंनी केलेल्या खुणा पाहून त्या भराभर बदल करतात. त्यांनी नेमकेपणानं साधलेली सम पाहून अनेकांना आश्‍चर्य वाटतं. राधा- कृष्णाच्या जीवनप्रसंगांवर आधारित नृत्य करताना आपणही कथा सांगू शकतो आणि तीही अभिजात नृत्याच्या भाषेतून, याचं आगळंवेगळं समाधान या मुलींच्या मनात भरून असतं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: ऐन दिवाळीत सोनं स्वस्त! धनत्रयोदशीनंतरही भाव घसरले; 10 ग्रॅमचा दर पाहून ग्राहकांची गर्दी, पाहा सोनं-चांदीचे ताजे भाव

Karnataka CM News : '2028 मध्ये डी. के. शिवकुमार हेच मुख्यमंत्रिपदी कायम राहतील, सिद्धरामय्यांनी आता पक्षासाठी काम करावं'; मंत्री जारकीहोळींनी स्पष्ट केली भूमिका

Married Woman and Lover : प्रेमप्रकरणातून टोकाचं पाऊल! दोन मुलांची आई अन् प्रियकरानं धावत्या रेल्वेखाली उडी मारुन संपवलं जीवन

Latest Marathi News Live Update : दोन दिवसांच्या उपचारांनंतर शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

Karjat Deforestation: 'टोरंट' वृक्षतोडीवर नाराज, भाजप नेत्याचा पक्षाला रामराम

SCROLL FOR NEXT