काही सुखद

खटावातील आरोग्य केंद्रांना 'श्वास'; सभापती घार्गेंचा पुढाकार

आयाज मुल्ला

वडूज (जि. सातारा) : खटाव तालुक्‍यातील कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्‍सिजनची जाणवणारी आवश्‍यकता लक्षात घेऊन पंचायत समितीने सेस निधीतून आरोग्य विभागासाठी दिलेल्या ऑक्‍सिजन मशिनचा रुग्णांना आगामी काळात निश्‍चितच चांगला फायदा होईल, असे मत सभापती रेखा घार्गे यांनी व्यक्त केले. 

खटाव पंचायत समितीच्या सेस निधीतून तालुक्‍यातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रांना व मायणी, पुसेगाव येथील कोरोना केअर सेंटरला अशा एकूण नऊ ऑक्‍सिजन मशिन देण्यात आल्या. त्यावेळी सभापती घार्गे बोलत होत्या. यावेळी उपसभापती आनंदराव भोंडवे, माजी सभापती संदीप मांडवे, सदस्या जयश्री कदम, नीलादेवी जाधव, गटविकास अधिकारी रमेश काळे, सहायक गटविकास अधिकारी नरेंद्र मेढेवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, पुसेगावचे माजी उपसरपंच रणधीर जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सौ. घार्गे म्हणाल्या, "पंचायत समितीच्या तीन लाख 45 हजार रुपयांच्या सेस निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्र व कोरोना केअर सेंटरला ऑक्‍सिजन मशिन देण्याचा निर्णय घेण्यात आला.'' संदीप मांडवे म्हणाले, "पंचायत समिती सदस्यांनी कोरोना काळात विकासकामांवर खर्च न करता त्यांचा सेस निधी ऑक्‍सिजन मशिनसाठी द्यावा, असा प्रस्ताव आपण मासिक बैठकीत मांडला. त्यास सर्वच सदस्यांनी एकमुखाने संमती दिली.'' तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख यांनी तालुक्‍यातील कोरोना संसर्ग व उपाययोजनांबाबत माहिती दिली. गटविकास अधिकारी श्री. काळे यांनी प्रास्ताविक केले. नरेंद्र मेढेवार यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT