काही सुखद

गोरगरीबांसाठी 'रोटरी'चा पुढाकार, रुग्णांना मिळतोय 'आधार'

जगन्नाथ माळी

उंडाळे (जि. सातारा) : शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील रुग्णांना मदत व्हावी, या उद्देशाने कऱ्हाड रोटरी क्‍लबच्या वतीने उंडाळे ग्रामीण रुग्णालय व येवती प्राथमिक आरोग्य केंद्र यांना दोन ऑक्‍सिजन मशिनचे नुकतेच वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे गरीब रुग्णांना आधार मिळणार असून, या उपक्रमाचे कौतुक होत आहे. 

यावेळी रोटरी क्‍लबचे अध्यक्ष गजानन माने, सचिव डॉ. शेखर कोगनुळकर, उपप्रांतपाल रणजित शेवाळे, डॉ. सुभाष पाटील, पोलिस उपनिरीक्षक महेंद्र पाटील, बापूराव पाटील, धनाजी पाटील, वैभव पाटील व ग्रामीण रुग्णालयातील सेवकांची उपस्थिती होती. या वेळी गजानन माने म्हणाले, "कऱ्हाड रोटरी क्‍लबच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. कोविड 19 या कालावधीमध्ये गोरगरीब रुग्णांना मदत व्हावी म्हणून औषध, गोळ्या, ऑक्‍सिजन मशिन वाटप करण्यात आले. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील रुग्णांना मदत व्हावी, यासाठी उंडाळे, येवती ग्रामीण रुग्णालयांना ऑक्‍सिजन मशिनचे वितरण करण्यात आले आहे.''

डॉ. शेखर कोगनुळकर म्हणाले, "रुग्णांना मदत व्हावी, या उद्देशाने रोटरी क्‍लबच्या वतीने या ऑक्‍सिजन मशिन देण्यात आल्या आहेत. कोविड 19 रुग्णांबरोबरच डिलिव्हरी पेशंटना आवश्‍यकता भासल्यास याचा वापर करता येणार आहे.'' डॉ. सुभाष पाटील, पोलिस निरीक्षक महेंद्र पाटील यांची भाषणे झाली. रणजित जोधाळ यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. ग्रामसेवक शरद चव्हाण यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामती, राहुरीत पोटनिवडणुकीची घोषणा, केंद्रीय निवडणूक आयोगाने तारखा केल्या जाहीर

Election Dates: देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला! निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर; पाहा संपूर्ण कार्यक्रम...

Gas Crisis: इंधन संकटाची शक्यता! गॅस वितरणासाठी महाराष्ट्र सरकारकडून विशेष नियम जारी; प्राधान्य कुणाला? पाहा यादी...

LPG Cylinder Blast: एलपीजी सिलिंडरचा भीषण स्फोट, दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू, ७ जण जखमी

Latest Marathi Live Update : Jalna: अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी मुलासोबत उपमुख्यमंत्री शिंदेची भेट घेतली

SCROLL FOR NEXT