काही सुखद

गरजूंना लाखमोलाचे 'टॅबलेट', पुण्यातील युवकांनी घडवला आदर्श थेट

गजानन गिरी

मसूर (जि. सातारा) : कवठे-मसूर येथील श्री ज्योतिर्लिंग विद्यालयातील 25 गरजू विद्यार्थ्यांना पुण्यातील विकास आयफाय फाउंडेशनतर्फे मोबाईल टॅबलेटचे वितरण फाउंडेशनचे निखिल बन्सल, अय्यान शेख यांच्या हस्ते झाले. 

निखिल बन्सल म्हणाले, ऑनलाइन शिक्षणासाठी एका कर्मचार्‍याच्या मुलास मदतीची आवश्यकता असल्याचे समजल्यानंतर विशिष्ट शाळा निवडली गेली व टॅब देण्याचे ठरले. माझ्या पालकांनी, इतर नातेवाइकांनी आणि मित्रांनी या मोहिमेस पाठिंबा दर्शविला. मोबाईल टॅबसाठी ऑर्डरही दिली. तद्नंतर विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. पुढाकाराची महत्वाकांक्षा खर्च केलेल्या रक्कमेपेक्षा अधिक असल्याचे त्यावेळी ख-या अर्थाने जाणवल्याचेही त्यांनी सांगितले.

शिक्षक दिलीप माने यांनी, मोबाईल टॅब अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑनलाइन शिक्षणात मदत करतील. शाळेत बरेच विद्यार्थी अभ्यासात चांगले आहेत आणि याचा त्यांना पुढच्या जीवनात नक्कीच लाभ होईल. मुख्याध्यापक शिंदे म्हणाले की, मोबाईल टॅब दिल्यामुळे शाळेची मोठी प्रगती होणार आहे. पुण्यातील विकास आयफाय फाउंडेशनतर्फे मोबाईल टॅबलेट विद्यार्थ्यांना मिळल्याने त्यांचे शैक्षणिक जीवन सुखकर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जगदीश कळसकर, सुनील पाटील, आनंदराव यादव, उपसरपंच अशोकराव पाटील, संचालक दिलीपराव यादव, मुख्याध्यापक जे. एम. शिंदे, निवृत्त पोलिस अधिकारी संभाजीराव यादव, ज्ञानेश्वर यादव, सागर कळसकर, संजय साळुंखे आदींसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रदीप पाटील, श्री. कळसकर, शिवानी यादव, विजय चव्हाण, वैष्णवी वायदंडे, सृष्टी यादव यांनी मनोगत व्यक्त केले. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्रप्रसाद चव्हाण यांनी स्वागत केले. दिलीप माने यांनी सूत्रसंचालन केले. सुनील साळुंखे यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana September Installment Date : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! सप्टेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार? समोर आली संभाव्य तारीख

मुंबईची धावपळ नकोशी! मुंबई सोडून हिमाचलमध्ये शिफ्ट होणार यामी गौतम-आदित्य धर? पण नक्की कारण काय?

Iran Missile Range : इराणच्या एकाच घोषणेमुळे अमेरिकेला भीती; ब्रिटनमधून बी-१ बॉम्बर विमाने परत बोलावली

Latest Marathi News Live Update : मराठवाड्यात पदवीधर मतदार संघाच्या प्रारूप यादीमध्ये उद्धव ठाकरेंचे नाव

Sujay Vikhe Patil: दुष्काळात शेतकऱ्यांना मदत महत्त्वाची; जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यामागे हाच हेतू : माजी खासदार सुजय विखे पाटील

SCROLL FOR NEXT