काही सुखद

मुलांसाठी सोडली त्यांनी शेती

सकाळवृत्तसेवा

टाकवे बुद्रुक - अत्यल्प शेती, तीही पावसाच्या भरवशावर... लेकरांचं पोट भरायला त्यांनी गाव सोडलं आणि मुंबईची वाट धरली...आईने धुणीभांडी, तर वडिलांनी माळीकाम केले...चार लेकरांचं पोट भरता भरता त्यांना सरकारी शाळेतून शिक्षणही दिले. आई-वडील दोघे अशिक्षित. आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून मुली शिकल्या. तर, मुलगा एमबीबीएस होऊन आंदर मावळातील पहिला डॉक्‍टर झाला.

विक्रम तानाजी वाडेकर असे या डॉक्‍टर मुलाचे नाव. तर, तानाजी वाडेकर असे अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव. विक्रमने नुकतीच मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी मिळवली. सध्या तो येथेच इंटर्नशिप करतोय. 

घरची शेती पावसाच्या भरवशावर होती म्हणून तानाजी वाडेकर यांनी तीन मुली, एक मुलगा व पत्नीला घेऊन नोकरीसाठी मुंबई गाठली. तत्पूर्वी विक्रम वाहनगावच्या जिल्हा परिषद शाळेत चौथीत शिकत होता. त्यानंतर त्याने मुंबईला विक्रोळी पार्क साईटला महापालिकेच्या शाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेतले. दहावीची परीक्षा व्यंकटेश विद्यानिकेतनमधून दिली. दहावीला ९१ टक्के व बारावीत विज्ञान शाखेतून ८० टक्के गुण मिळविले. पुढे एफएसआयटीच्या परीक्षेत त्याला ४७३ गुण मिळाले. या जोरावर त्याला मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश मिळाला. साडेचार वर्षांचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. मुलाने कष्टाचे चीज केले, अशी आई आशाबाई आणि वडील तानाजी यांची भावना आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole News: उन्हाच्या झळांनी घेतला जीव; अकोले तालुक्यातील शेतकरी कोसळून मृत, ४१ अंश तापमानात दुर्दैवी घटना..

Latest Marathi News Live Update : खोपोली पेण रस्त्यावर हायवा डंपरला लागली आग

रस्त्याच्या कामाच्या बिलावर २ टक्के मागणी, लाच घेताना ZP इंजिनिअरसह ३ अधिकाऱ्यांना अटक

Mahad Chavdaar Tale: इतिहास जागा झाला! चवदार तळ्यातील ११ विहिरींचे दर्शन, ऐतिहासिक लढ्याच्या साक्षीदारांना पाहण्यासाठी गर्दी..

Medical College: ‘सिव्हिल’ आता होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय: ४४८ पदांसाठी अध्यादेश, पुढच्या वर्षी पहिल्या बॅचचे ॲडमिशन

SCROLL FOR NEXT