hamida-begam 
काही सुखद

सायदाला मिळाली तीस वर्षांनंतर मायेची ऊब

दिलीप कुऱ्हाडे

येरवडा - सायदा एक वर्षाची असताना तिची आई हरवली होती. शोध घेऊनही सापडली नसल्याने कुटुंबीयांनी त्या परतण्याची आशा सोडली. पण येरवड्यातील मनोरुग्णालयाच्या प्रयत्नामुळे तीस वर्षांनंतर सायदाला आईच्या मायेची ऊब मिळाली.

आसाम येथील हमिदा बेगम तीस वर्षांपूर्वी हरविल्या होत्या. रुग्णालयातील औषधोपचार, येथील समाजसेवक व आसाम पोलिसांच्या प्रयत्नातून हमिदा यांना त्यांची मुलगी सायदा सुलतान मिळाली. आईला घेण्यासाठी सायदा आपला मामेभाऊ अलिमुद्दीन यांच्यासह आल्या होत्या. मायलेकीच्या भेटीमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनासुद्धा अश्रू अनावर झाले.

मुलगी सायदा एक वर्षाची असताना हमिदा बेगम उदाली (जि. लंका, रा. आसाम) येथून हरविल्या होत्या. त्या मुंबईतील एका रेल्वे स्थानकावर सापडल्या. पोलिसांनी त्यांना १९८९ मध्ये ठाण्यातील मनोरुग्णालयात दाखल केले. जून २०१९ मध्ये त्यांना येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अभिजित फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मानसोपचारतज्ज्ञ डॉ. जयसिंह इंगळे, समाजसेवक मारुती दुनगे तेथील रुग्णांशी चर्चा करून नाव, पत्ता शोधत होते. वैद्यकीय उपचार व समुपदेशनामुळे हमिदा यांची मानसिकता सुधारत होती. समुपदेशनामध्ये त्या आसाममधील असल्याची जुजबी माहिती दिली. त्यावरून दुनगे यांनी तेथील पोलिसांशी संपर्क साधून नातेवाइकांना याची माहिती दिली. त्यानंतर दुनगे यांनी हमिदा यांचे भाऊ अल्लीमउद्दीन यांच्याशी व्हिडिओ कॉन्फन्सवर संवाद साधला. अल्लीमउद्दीन यांनी तीस वर्षांपूर्वी हरविलेल्या बहिणीला ओळखले. त्यांनी तत्काळ भाची सायदा यांच्यासह पुणे गाठले. 

हमिदा यांना पाहताच मुलीचा मायेचा बांध फुटला. सर्वत्र चौकशी केल्यानंतरही हमिदा यांचा शोध लागत नव्हता. रुग्णालयातून बाहेर पडताना नातेवाइकांनी अधीक्षक डॉ. फडणीस व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले. केवळ मनोरुग्णालयामुळे आपली आई तब्बल तीस वर्षांनी सुस्थितीत मिळाल्याचा आनंद त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर होता. या क्षणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनासुद्धा अश्रू आवरता आले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Open or Closed Update: अनंत चतुर्थीला महाराष्ट्रात बँका सुरू की बंद? RBI कडून मोठी अपडेट

IND vs WI, Live Streaming: भारत-वेस्ट इंडिज संघात ३ वनडे अन् ५ टी२० सामन्यांचा रोमांच! कधी, कुठे अन् किती वाजता पाहाणार मॅच?

Nandigram By-Election Symbol Controversy : निवडणूक आयोगाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर; 183 चिन्हं असताना 'लिफाफा' वरच वाद का? हायकोर्टानं कोणाला सुनावलं?

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Thane Water Supply: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! २४ तास पाणीकपात, कोणत्या भागांना फटका?

SCROLL FOR NEXT