काही सुखद

केळघर आरोग्य केंद्रावर ग्रामस्थांची 'सावली'!

विजय सपकाळ

मेढा (जि. सातारा) : केळघर प्राथमिक आरोग्य केंद्रास सावली ग्रामस्थांनी 40 हजार किमतीचे चार बेड तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना कवारे यांच्याकडे सुपूर्द केले. या वेळी सर्वांनीच सरपंच जुनघरे यांच्या कार्याचे कौतुक केले. 

कोरोना महामारीच्या साथीमध्ये शहरी भागांबरोबरच सध्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे सर्वसामान्यांना आरोग्यसेवा वेळेत, अधिक मिळाव्यात. या सेवा उपलब्ध होताना त्यात आपल्या सावली गावाचेही दायित्व असावे, तसेच जावळी कोविड इमर्जन्सीच्या जयश्री शेलार यांनी केलेल्या आवाहनाला अनुसरून सरपंच नंदा जुनघरे यांनी आपल्या गावातील समस्त ग्रामस्थांना सोशल मीडियावरून मदतीचे आवाहन केले होते. पाहता पाहता हजारो रुपये जमा होवून त्यातून 40 हजार किमतीचे चार बेड खरेदी करून ते आरोग्य केंद्राला सुपूर्द केले. 

यावेळी जावळीचे तहसीलदार शरद पाटील यांनी कोविड काळातील नेमकी गरज ओळखून ग्रामस्थांनी केलेल्या मदतीबद्दल प्रशासनाच्या वतीने धन्यवाद दिले. डॉ. साधना कवारे यांनीही सावली गावच्या दातृत्वाचे कौतुक केले. यावेळी 14 व्या वित्त आयोगातून गावातील प्रत्येक कुटुंबास ग्रामपंचायतीच्या वतीने कचराकुंडीचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्य सेवक विशाल रेळेकर, सतीश मर्ढेकर, उपसरपंच दुर्योधन जुनघरे, पोलिस पाटील संजय कांबळे, ग्रामसेविका कुंभार, आशा सेविका शैला म्हस्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, नेहरू युवा मंडळाचे सदस्य उपस्थित होते. शिक्षक शामराव जुनघरे यांनी सूत्रसंचालन केले. विश्वासराव जुनघरे यांनी प्रास्ताविक केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय सपकाळ यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT