काही सुखद

ऊसतोड मजुराचा  मुलगा पीएसआय

सकाळवृत्तसेवा

सांगली - जत तालुका राज्यात तीव्र दुष्काळी म्हणून ओळखला जातो. या तालुक्‍यातील सनमडीच्या ऊसतोड मजूर पांडुरंग सोपान नरळे यांच्या मुलाने परिस्थितीवर मात करून फौजदार परीक्षेत यश मिळवले. 

पांडुरंग नरळे यांनी राजारामबापू कारखान्यात  (साखराळे) येथे २५ वर्षे ऊसतोड मजूर म्हणून काम केले. ऊसतोड मजुरी करणाऱ्या नरळे यांनी मुलगा काशिनाथला सांगोला तालुक्‍यातील किडेबिसरी येथे शिक्षणासाठी ठेवले. 

दहावीत असताना काशिनाथ यांनी रोजगार हमीसह ऊसतोडी काम केले. १२ वीला विज्ञान शाखेत चांगले गुण मिळवून जत येथे गोब्बी कॉलेजमध्ये डीएड्‌ला  प्रवेश मिळवला. पण आर्थिक विवंचनेतून अर्ध्यातून शिक्षण सोडावे लागले. २००८ ला राज्य राखीव पोलिस दलात भरती झाले. आठ वर्षे गडचिरोली येथे सेवा केल्यानंतर लातूर येथे कार्यरत झाले. २०१६ मध्ये लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेत ४०० पैकी २५६ गुण मिळवून ५०१ व्या क्रमांकाने पहिल्या प्रयत्नात ते उत्तीर्ण झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Tragedy : चॅटजीपीटीवरून कॉपी करताना पकडला, पवई आयआयटीच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन

Ajit Agarkar : "मलाच या पदावर आता राहायचे नाही, तुम्ही नवीन अध्यक्ष शोधा..."; अजित आगरकरचं पत्र, BCCI कडूनही उत्तर; फुल ड्रामा

Latest Marathi News Update : अखेर भुलेश्वर राजाची मुर्ती पुन्हा विराजमान, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी

श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांची २५० कोटींची संपत्ती कुणाला मिळाली? मृत्यूनंतरही वर्षाला मिळणारे १३ कोटी कुणाच्या खात्यात जातात?

Monsoon Returns in Marathwada : मराठवाड्यात चार दिवस परतीचा पाऊस रविवारपासून हजेरी, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त

SCROLL FOR NEXT