काही सुखद

सरपंचांनी भागविली गावाची तहान

सकाळवृत्तसेवा

म्हाकवे - उन्हाच्या तडाख्यामुळे पिराचीवाडी (ता. कागल) गावाला पाणी पुरवणाऱ्या विहिरीने तळ गाठल्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. यावर मात करण्यासाठी सरपंच सुभाष भोसले यांनी दूधगंगा नदीतून शेतीसाठी आणलेल्या पाणी योजनेलाच गावची पाणी योजना जोडून दिलासा दिला. आठ दिवसांतून एकदा मिळणारे पाणी सरपंच भोसले यांच्या दातृत्वामुळे मुबलक मिळत आहे.

तालुक्‍यात पश्‍चिमेकडील डोंगरमाथ्यावर वसलेले पिराचीवाडी दोन हजार लोकवस्तीचे गाव. पिण्यासह शेतीच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. परिणामी उपजीविकेसाठी परपेठेवर हमाली करण्याशिवाय पर्याय नव्हता. वर्षभरापूर्वी गहिनीनाथ पाणीपुरवठा संस्थेच्या माध्यमातून सरपंच सुभाष भोसले यांनी अडथळ्यांची शर्यत पार करून दूधगंगा नदीतून सुमारे सात कि.मी. अंतरावरून पाणी योजना आणली. यामुळे गावात हरितक्रांती साकारायला मदत झाली.

पिण्याच्या पाण्याची योजना सोनाळी येथील विहिरीतून केली आहे. मात्र उन्हाच्या तडाख्यामुळे विहिरीने तळ गाठल्यामुळे महिनाभरापासून पाण्यासाठी गावकऱ्यांना वणवण करावी लागत होती. अखेर गावची तहान भागवण्यासाठी भोसले यांनी शेतीचे पाणी कमी करून योजनेचे पाणी थेट गावच्या योजनेला जोडले. यामुळे गाव पाणीदार झाले.

विहिरीने तळ गाठल्याने गावात आठ दिवसांतून एकदा पाणी येत होते. गावकऱ्यांची पाण्यासाठी ऐन उन्हात वणवण होऊ नये यासाठी पिकांसह आर्थिक नुकसानीचा विचार न करता योजनेचे पाणी गावकऱ्यांना दिले.
 - सुभाष भोसले, सरपंच

अनेक अडथळ्यांवर मात करीत पाणी योजना करून पिराचीवाडीसारख्या डोंगरमाथ्यावर हरितक्रांती फुलविली आहे. गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्‌भवताच भोसले यांनी स्वतःच्या योजनेचे पाणी गावच्या योजनेला जोडून ग्रामस्थांची ऐन उन्हाळ्यात होणारी वणवण थांबवली. सुभाष भोसले आमच्यासाठी जलदूतच ठरले आहेत.
- दत्तात्रय सुतार, हौसाबाई दाभोळे, ग्रामस्थ, पिराचीवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईच्या पाणीप्रश्नावर पालिकेला विहिरींची आठवण, विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याची योजना

अमेरिकेत हिंदू मंदिरात नरसंहाराचा कट, गोळीबार करताना ट्रिगर जाम झाल्यानं अनर्थ टळला, १९ वर्षीय तरुणाला अटक

तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकरांच्या लेकाचा संयम संपला; नाव न घेता दिलं उत्तर; म्हणाला- मी त्यांना एवढंच सांगेन...

Latest Marathi News Update : कराड येथील कृष्णा साखर कारखान्याचे गाळप बंद, माजी खासदार राजू शेट्टी कारखानास्थळी दाखल

Mohol Sugarcane Protest: ऊसदराचा तिढा पुन्हा पेटला! पहिली उचल पाच हजार रुपये द्या; कुरुलमध्ये शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर अडविला

SCROLL FOR NEXT