काही सुखद

हाताला बोटे नसतानाही मनोज कुंभार घडवतात गणरायाच्या मूर्ती

एखादी गोष्ट करण्याची मनात जिद्द असेल तर येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करून माणूस ध्येय निश्चितीकडे वाटचाल करत राहतो.

- मिलिंद संगई

बारामती - एखादी गोष्ट करण्याची मनात जिद्द असेल तर येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करून माणूस ध्येय निश्चितीकडे वाटचाल करत राहतो. बारामतीतील मनोज कुंभार (Manoj Kumbhar) यांचीही कहाणी (Story) काहीशी अशीच....अनेकांना प्रेरणा देणारी अन् परिस्थितीवर मात करून ध्येयपूर्ती करता येते याचे मूर्तिमंत उदाहरण नजरेसमोर ठेवणारी.

बारामतीतील एका कुंभार व्यावसायिक कुटुंबात मनोज यांचा जन्म झाला. पण नियतीने त्यांच्या पुढ्यात काही वेगळेच वाढून ठेवले होते. जन्मतः त्यांच्या दोन्ही हातांना बोटेच नव्हती. निसर्गाने एक गोष्ट हिरावून घेतली असली तरी दुसरीकडे मनोज यांना चांगली कलाही उपजतच दिली. मातीच्या मूर्ती घडवणाऱ्या कुंभारांच्या घरात जन्म झाला आणि जन्मापासूनच मातीशी मनोज यांची नाळ जोडली गेली. वडील मातीपासून मूर्ती तयार करताना पाहून एक दिवस त्यांनीही दोन हत्तीच्या मूर्ती साकारल्या. त्यांच्या हातातील कला पाहून आई वडीलही चकित झाले.

मनोज यांच्या बोटांच्या समस्येमुळे शाळेतही त्यांना प्रवेश मिळत नव्हता पण अखेर त्यांना प्रवेश मिळाला. निसर्गाने बोटे दिली नाहीत पण बोटांशिवाय चित्र काढण्याची कला दिली. त्यांनी यावर मात करत स्वावलंबी बनण्याचा संघर्ष सुरु केला. या प्रवासात त्यांना अनेकदा नैराश्य आले पण त्यांनी जिद्द सोडली नाही. त्यांची ही जिद्द पाहून बारामतीतील विद्या प्रतिष्ठान संस्थेने इंग्रजी शाळेत कलाशिक्षक म्हणून उत्तम पगाराची नोकरी देऊ केली. आजही गणेशोत्सवात मनोज यांचे हात गणरायाची मूर्ती सुबकपणे घडविताना थकत नाहीत. समाजोपयोगी काहीतरी करावे या उद्देशाने मनोज कुंभार व विनोद खटके या दोघांनी मिळून प्रतिबिंब हे युट्यूब चॅनेल सुरु केले. त्याच्यावरही प्रेरणादायी बाबी दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

मी आयुष्यात खूप काही कमावले आहे किंवा खूप यशस्वी व्यक्ती झालोय असे नाही, पण अवहेलनेच्या छातीवर जिद्दीने उभा राहिलोय, माझ्या अपंगत्वालाच माझे शक्तिस्थळ बनवून वाटचाल करीत आहे.

- मनोज कुंभार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan MEMU Train : उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणं झालं सोपं! दिवा ते चिपळूण स्पेशल मेमू धावणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक आणि थांबे

ICC ने जाहीर केली वार्षिक कसोटी क्रमवारी! भारताला झाला फायदा, पण ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व कायम

Maharashtra Government : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने लंडनमध्ये 'अध्यासन'; राज्य सरकारचा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांना मिळणार खास स्कॉलरशिप!

Thane: ठाणे एसटीची घसरगुंडी! राज्यस्तरीय कामगिरी परीक्षणात आगारांना नकारात्मक गुण

Thane: शिक्षक बदल्यांवरून वाद! भिवंडी शाळांमध्ये पर्यायी नियुक्ती न झाल्याने शिक्षण व्यवस्थेवर ताण

SCROLL FOR NEXT