काही सुखद

जलकन्या भक्ती जाधवच्या प्रयत्नांना शेकडो हातांची साथ 

रजनीश जोशी

सोलापूर - सुमारे दहा लाख लोकसंख्येच्या सोलापूरला चार दिवसाआड पाणीपुरवठा होतो. शहरालगतचा हिप्परगा तलाव पाण्यापेक्षा गाळानेच भरलेला. अंदाजे 1866 ते 1871 मध्ये बांधलेल्या तलावातील गाळ काढल्यास शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पुरेसा पाणीपुरवठा होईल, हे ध्यानात घेऊन चार वर्षांपासून भक्ती जाधव तरुणीने आरंभी एकटीने हिप्परग्यातील गाळ काढण्याचे प्रयत्न केले. आता त्याला यश येताना दिसत आहे. 

"हिप्परगा'मध्ये 42 दशलक्ष घनमीटर (पाच ब्रासचा ट्रक असे गृहित धरल्यास 26 लाख ट्रक) गाळ आहे. 41 ते 43 अंश सेल्सिअस तापमानात पाणीविरहीत तलावात उभे राहून भक्तीने गाळ काढण्यासाठी कंबर कसली. तिचा हा ध्यास आणि कामातील प्रामाणिकपणा पाहून अनेक तरुण, संघटना आणि परिसरातील शेतकरी मदतीला धावले. लोकसहभागातून हिप्परगा तलावातील गाळ काढला जाऊ लागला. जलसंवर्धन अभियान म्हणून ही मोहीम आकाराला आली. 

सुमारे तीन वर्षांपूर्वी भक्तीने "लोकमंगल उद्योग समूहा'चे प्रमुख, आमदार सुभाष देशमुख यांची भेट घेऊन मदत मागितली. त्यांनी जेसीबी मशिन मोफत उपलब्ध केले. त्या वेळी संरक्षणमंत्री असलेल्या मनोहर पर्रीकर यांनाही भेटून गाळ काढण्यासाठी लष्कराची मदत मिळेल काय, अशी विचारणा केली. भक्तीच्या तळमळीमुळे अनेक सेवाभावी संस्था, व्यक्तींनी जलसंवर्धन अभियानासाठी निधी दिला. तरुणांनी श्रमदान केले. हिप्परगा तलावाच्या आसपासच्या शेतकऱ्यांनी गाळ स्वखर्चाने आपल्या शेतात नेऊन टाकला. तलावात अनेक वर्षे कुजलेला गाळ पिकासाठी अत्यंत उपयुक्त ठरला. 4500 शेतकऱ्यांनी चार वर्षांत गाळ नेला. आतापर्यंत 70 हजार ट्रक गाळ काढण्यात आला. आणखी दहा वर्षे हे काम चालेल. 

गाळ काढल्याने हिप्परगा तलावाची पाणी साठवण क्षमता 9 कोटी लिटरने वाढली आहे. सोलापूरकरांना रोज 110 दशलक्ष लिटर पाणी लागते. सध्या ते चार दिवसांतून एकदाच दिले जाते. वाढलेल्या पाणी साठवण क्षमतेमुळे पाणीटंचाई घटली आहे. भक्तीला तिचे बंधू संदीप व संदेश जाधव प्रत्येक टप्प्यावर मदत करतात. वडील प्रा. मधुकर जाधव यांचेही मार्गदर्शन असते. या महिन्याच्या अखेरीस हे काम पुन्हा सुरू होईल. गाळ संपेपर्यंत ते सुरूच राहील! 

हिप्परगा तलाव गाळमुक्त करणे हेच जीवनाचे ध्येय आहे. सुरवातीला अशक्‍य वाटणारे हे काम लोकसहभागामुळे सहज होईल, असा विश्‍वास निर्माण झाला आहे. 
- भक्ती जाधव, समन्वयक, जलसंवर्धन अभियान, सोलापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT