काळेगाव (ता. बार्शी) - येथील सुवर्णा व शंकर घायतिडक यांचा यशस्वी पहिला रेशीम उद्योग. 
काही सुखद

शेतकऱ्यांच्या आर्थिक घडीला रेशीम धागा

भीष्माचार्य ढवण

सासुरे - बार्शी रोडवरील काळेगाव (ता. बार्शी) सोलापूर कृषी विज्ञान केंद्राने हे गाव तीन वर्षांसाठी दत्तक घेतले आणि गावाचा कायापालट झाला. गावात शेतीला आधुनिकतेबरोबरच शाश्‍वत उद्योगाची जोड मिळत आहे. सध्या, गावात एकूण 25 शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळाले आहेत. त्यामुळे पुढील काळात काळेगावची ओळख "रेशमी काळेगाव' म्हणून होणार आहे.

सोलापूर कृषी विज्ञान केंद्राने शासनाच्या योजना समजून घेऊन त्याचा योग्य लाभ घेतल्यास शेती कशी फायदेशीर होऊ शकते, हे प्रात्यक्षिकरीत्या दाखवून दिले. याविषयीही मार्गदर्शन केले. केंद्रातर्फे शेतकऱ्यांना वाई, पाचगणी, भाळवणी याठिकाणच्या रेशीम उद्योगांची प्रत्यक्ष भेटीमार्फत माहिती दिली.

आज या गावात शेतीला आधुनिकतेबरोबरच शाश्‍वत जोडधंद्याची जोड मिळत आहे. शेतीला वेगळा पर्याय म्हणून काळेगावचे शेतकरी रेशीम उद्योगात रमले आहेत. यासाठी गावातील एकूण 25 शेतकऱ्यांनी यासाठी स्वतंत्र गट निर्माण करून रेशीम उद्योगासाठी कंबर कसली आहे. यातील अवघ्या नववीपर्यंत शिक्षण घेतलेल्या अल्पभूधारक शेतकरी शंकर व सुवर्णा घायतिडक या पती-पत्नींनी गावातील पहिला रेशीम उद्योग यशस्वी करून दाखविला आहे. त्यांनी मनरेगा योजनेअंतर्गत स्वतःचे 50 बाय 60 आकाराचे शेड बनवून त्यामध्ये 60 हजार कोष कीटक जोपासले आहेत. यासाठी एक एकर क्षेत्रावर व्ही -1 या तुती वृक्षांची लागवड पाच बाय दोनप्रमाणे पट्टा पद्धतीने केली. यासाठी त्यांनी खर्चात बचत करणारी फांदी पद्धत निवडली आहे. अंडी कुंज लाभल्यापासून फक्त एकाच महिन्यात त्यांची पहिली कोष बॅच यशस्वीरीत्या हाती आली. वर्षातून एकूण चार बॅच बाहेर पडल्यास त्यांना एकूण सुमारे अडीच लाखांचे उत्पादन मिळू शकते.

रेशीम उद्योगाकडे वळलेत 25 शेतकरी ...
दीपक घायतिडक, संजय घायतिडक, अण्णासाहेब घायतिडक, सतीश घायतिडक, दशरथ घायतिडक, शिवाजी गिलबिले, शामल घायतिडक, उद्धव घायतिडक, पांडुरंग घायतिडक, शिवाजी घायतिडक, श्रीधर देशमुख, सुनील घायतिडक, भारत घायतिडक, दादा देशमुख, संतोष घायतिडक, प्रकाश देशमुख, लालासाहेब घायतिडक, लहू काळे, अशोक घायतिडक, पांडुरंग देशमुख, दादा मस्तूद, प्रभू काळे, शंकर घायतिडक .

रेशीम कोषला बाजारपेठ कोठे?
तयार झालेल्या कोषाला रामनगर (कर्नाटक) येथे प्रतिकिलो 500 ते 720 रुपयांप्रमाणे दर मिळतो.

अनुदान कोठून, कसे व किती मिळते?
शासनाच्या मनरेगा योजनेतर्फे अल्पभूधारक शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने 2 लाख 90 हजार रुपयांचे अनुदान मिळते. यासाठी आवश्‍यक कागदपत्रके तहसील कार्यालय व रेशीम कार्यालय सोलापूर यांच्याकडे जमा करावीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole News: उन्हाच्या झळांनी घेतला जीव; अकोले तालुक्यातील शेतकरी कोसळून मृत, ४१ अंश तापमानात दुर्दैवी घटना..

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत उष्णतेचा फटका! यलो अलर्ट, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक धोक्यात

रस्त्याच्या कामाच्या बिलावर २ टक्के मागणी, लाच घेताना ZP इंजिनिअरसह ३ अधिकाऱ्यांना अटक

Mahad Chavdaar Tale: इतिहास जागा झाला! चवदार तळ्यातील ११ विहिरींचे दर्शन, ऐतिहासिक लढ्याच्या साक्षीदारांना पाहण्यासाठी गर्दी..

Medical College: ‘सिव्हिल’ आता होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय: ४४८ पदांसाठी अध्यादेश, पुढच्या वर्षी पहिल्या बॅचचे ॲडमिशन

SCROLL FOR NEXT