

Raj Thackeray
ESakal
मुंबई : काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावरील डॉक्युमेंट्री पोस्ट केली होती. मात्र त्यांनी आता ती डॉक्युमेंट्री पोस्ट डिलीट करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी केलेल्या विनंतीचा मान राखून ही पोस्ट डिलीट करत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.