काही सुखद

विद्यार्थ्यांनी बनवले स्वस्त, कार्यक्षम फवारणी यंत्र

गोपाल हागे

शेगाव (जि. बुलढाणा) येथील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसमधील स्कूल अाॅफ इंजिनिअरींग ॲंड रिसर्च टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बहुउपयोगी फवारणी यंत्र बनविले अाहे. हे ट्रॅक्टरशिवाय चालणारे यंत्र स्वस्त असून, लहान शेतकऱ्यांना उपयुक्त ठरू शकते. 

सिद्धिविनायक टेक्निकल कँम्पसमधील स्कूल ऑफ इंजीनिअरिंग अँड रिसर्च टेक्नॉलॉजीमधील गणेश रामेश्वर गळस्कार, कृष्णा रवींद्र महारखडे, निशिकांत दत्तात्रय बोंडे, अंकित बळीराम खोंदले, अतुल दिलीप रावणकार या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शेतामध्ये फवारणीदरम्यान येणाऱ्या विविध अडचणींचा अभ्यास केला. त्यावर मात करण्यासाठी सुलभ अशा फवारणी यंत्राची निर्मिती केली आहे. या यंत्राच्या निर्मितीसाठी दहा हजार रुपये खर्च आला आहे. या यंत्राचा विविध उंचीच्या पिकामध्ये व फळबागेमध्येही फवारणीसाठी होऊ शकतो. 

अाधी केली यंत्रांची चाचणी
बाजारामध्ये उपलब्ध विविध फवारणी यंत्रांचे प्रकार, त्यांची फवारणी क्षमता यांचा प्रथम अभ्यास करण्यात आला. फवारणीसाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींचा विचार करून, यंत्राची निर्मिती करण्यात आला. या अंतिम वर्षाच्या प्रकल्पाला यंत्र अभियांत्रिकी विभागाचे सहा. प्रा. अनुप गावंडे यांनी मार्गदर्शन केले असून, प्राचार्य डॉ. अनंत कुलकर्णी यांनी प्रोत्साहन दिले. 

कृषी महोत्सवांमध्ये ठरले अाकर्षण 
   अमरावती येथे एक ते पाच फेब्रुवारी दरम्यान झालेल्या कृषी महोत्सवात या यंत्राचे प्रदर्शन केले होते. त्या वेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, अामदार सुनील देशमुख यांनी भेट देऊन कौतुक केले. 

   खामगाव येथे १६ ते २१ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या कृषी महोत्सवातही यंत्राने शेतकऱ्यांना अाकर्षित केले. या वेळी राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार, अामदार आकाश फुंडकर यांनी या यंत्राविषयी माहिती घेतली. 

यंत्राची वैशिष्ट्ये ः 
   तीन चाकांवर उभारलेल्या प्लॅटफॉर्मवर ४० लिटर टाकी बसवली आहे. तिथे टू स्ट्रोक (२५ सीसी) पेट्रोल इंजिन आणि सिंगल पिस्टन एचटीपी (१ एचपी) क्षमतेचा पंप बसवला आहे. दिशा देण्यासाठी त्याला एक हॅण्डल बसवला आहे.
   आडव्या पाइपवर गरजेनुसार सहापासून १० पर्यंत नोझल बसवता येतात. तसेच हे नोझल असलेले पाइप आडवे किंवा उभे करता येते.  
   लागवड चाकांतील अंतर कमी जास्त करता येते.
   पिकाच्या उंचीनुसार प्लॅटफॉर्मची उंची १० फुटापर्यंत कमी अधिक करता येते. 
 : गणेश गळस्कार, ९९२१८८८८७४
 : प्रा. अनुप गावंडे, ९७६४००८९७९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT