कोयंबटूर : काही लोक फारच हळव्या मनाचे आणि संवेदनशील असतात. कुणाला काही दु:ख झालं तर त्यांनाही हळहळायला होतं. 'वेदना जाणावयाला जागवू संवेदना' या उक्तीप्रमाणे ते जीवन जगत असतात. आपल्या आजूबाजूला अनेक संवेदनशील लोक याचप्रमाणे भूतदया ठेवून जगत असतात. प्राण्यांप्रती त्यांना अपार करुणा असते. त्यांचं दु:ख ते आपलं दु:ख अशी त्यांची भावना असते. अशाच एका भुतदयेचे दर्शन झाले आहे. वीरा नावाच्या एका कुत्र्याचे अपघातात दोन्ही पाय गेले होते. यामुळे हा कुत्रा लंगडत चालत होता. मात्र, या कुत्र्यावर असलेल्या प्रेमापोटी त्याला एक व्हिलचेअर बनवून दिली गेली आहे. आता या व्हिलचेअरच्या मदतीने वीरा सहजतेने कुठेही येऊ-जाऊ शकतो. पाय तुटल्यावर त्याची वाईट अवस्था अनेक पशुप्रेमींना बघवली नाही. म्हणून मग त्यांनी त्याच्यासाठी व्हिलचेअर बनवायचा निर्णय घेतला. सोबतच त्याला दत्तकदेखील घेतलं गेलं आहे.
आपल्या मेकॅनिकल इंजिनिअर वडिलांच्या मदतीने आयटी इंजिनिअर असलेल्या गायत्री यांनी ही व्हिलचेअर बनवली आहे. गायत्री यांचं म्हणणं आहे की, त्यांनी शहरातील एका आश्रय गृहातून या वीराला दत्तक घेतलं. तसेच त्याला कोरोना काळात घरी आणलं.
त्यांनी म्हटलं की, मी लहानपणापासूनच कुत्र्यांवर प्रेम करते. पण अभ्यासामुळे मला वेळ नव्हता, त्यामुळे मी कुत्रा पाळू शकले नाही. मात्र, जेंव्हा कोरोना काळात मी घरुन काम करु लागले तेंव्हा मला वेळ मिळू लागला तेंव्हा मला वाटलं की कुत्रा पाळण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.
गायत्रीने म्हटलं की, मी आश्रय गृहामधून कुत्र्याला दत्तक घेतलं ज्याने आपले दोन्ही पाय गमावले होते. माझे वडील एक मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. त्यांनी वीरासाठी व्हिलचेअर तयार करायचा निर्णय घेतला. वीराला त्याच्या पट्ट्याशी जोडलेला व्हिलचेअर त्याला पुढच्या पायांनी चालण्यासाठी आणि उभं राहण्यासाठी मदत करतो. व्हिलचेअरचे टायर पिवळ्या रंगाचे आहेत. या व्हिलचेअरमुळे त्या कुत्र्याला आता चालण्या-फिरण्यात अडचण येत नाहीये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.