येरवडा - प्रादेशिक मनोरुग्णालयात प्रकाश देशपांडे व त्यांचे नातेवाइक. सोबत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी. 
काही सुखद

बेपत्ता पित्याची तपानंतर भेट

सकाळवृत्तसेवा

येरवडा - मुंबई येथील प्रकाश देशपांडे बारा वर्षांपूर्वी हरविले होते. नातेवाइकांनी त्यांची आशा सोडली होती. दरम्यान, सोलापूर येथील एका स्वयंसेवी संस्थेने त्यांना मनोरुग्ण म्हणून न्यायालयाच्या परवानगीने येरवडा मनोरुग्णालयात दाखल केले. रुग्णालय प्रशासन व मुंबई पोलिसांच्या प्रयत्नांमुळे देशपांडे हे तब्बल बारा वर्षांनंतर आपल्या घरी परतले आहे. त्यांना घेण्यासाठी त्यांची मुलगी आली होती. बापलेकीची ही भेट पाहून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांही अश्रू आवरता आले नाही.

सोलापूर येथील एका स्वयंसेवी संस्थेने पाच महिन्यांपूर्वी प्रकाश गजानन देशपांडे (वय ५४) यांना न्यायालयाच्या परवानगीने मनोरुग्ण म्हणून येरवडा येथील रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अभिजित फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मनोविकारतज्ज्ञ डॉ. मनोहर पवार व समाजसेवक अधीक्षक ब्रह्मदेव जाधव यांनी देशपांडे यांच्यावर उपचार सुरू केले. वैद्यकीय उपचार व समुपदेशनामुळे ते बरे होऊ होते. त्या वेळी जाधव रुग्णांशी चर्चा करून नाव, पत्ता शोधत होते. त्या वेळी देशपांडे यांनी मुंबईतील पत्त्याबाबत जुजबी माहिती दिली. त्यावरून जाधव यांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधून दादर येथील देशपांडे यांच्या नातेवाइकांना त्यांच्याबदल माहिती दिली. 

दादर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक एस. भाबड यांनी त्यांच्या नातेवाइकांना अखेर शोधून काढले. देशपांडे यांची पत्नी व मुलीस याबाबत माहिती मिळताच त्यांनी कागदपत्रांसह समाजसेवा अधीक्षकांशी संपर्क साधला. त्यानंतर ते मनोरुग्णालयात आले व मुलीने तत्काळ आपल्या वडिलांना ओळखले.

अनपेक्षित झाली भेट
बारा वर्षांपूर्वी हरविलेल्या प्रकाश देशपांडे यांचा नातेवाइकांनी सगळीकडे शोध घेतला होता. मात्र ते सापडले नव्हते. त्याबाबत त्यांनी पोलिस ठाण्यात ते हरविल्याची नोंद केली होती. परंतु, त्यांचा शोध न लागल्याने नातेवाइकांनी ते परत येण्याची आशा सोडून दिली होती. मात्र त्यांची आता परत नातेवाइकांशी भेट झाली. यामुळे त्यांच्या कुटुंबांचा आनंद ओसंडून वाहत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price Hike : दिवाळीच्या तोंडावर महागाईचा झटका ! व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला; जाणून घ्या मुंबईसह देशातील प्रमुख शहरांतील नवे दर

Pune Weather Update: पुणेकरांसाठी हवामानाची गुड न्यूज! तापमानात घट होणार, पुढील दोन ते तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता

Disclosure Day Movie Review : साय-फाय चित्रपट पाहताना विचारांना नवी दिशा; ‘डिस्क्लोजर डे’मधील चार कथांचा अनोखा प्रवास

Success Story: रायगडच्या लेकीची आकाशाला गवसणी! सानिका पांगारेची विमान क्षेत्रात भरारी, शिष्यवृत्तीची साथ अन् जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातील हवामानात बदल; कोकण ते विदर्भात पावसाची शक्यता, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

SCROLL FOR NEXT