काही सुखद

पाटणच्या डॉक्‍टरांना 1200 पीपीई किटचं 'संरक्षण कवच'

अरुण गुरव

मोरगिरी (जि. सातारा) : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून सातारा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. बुधवारी रात्री आलेल्या अहवालात एकूण 817 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात 738 जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. तर 21 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत असताना व गावे स्वयंस्फूर्तीने बंद पाळत असताना नागरिक बेफिकीरीने वागत आहेत. त्यामुळे पोलिसांनी मास्क न वापरणा-या, तसेच सोशल डिस्टन्स न पाळणा-या लोकांवर कारवाई वाढवली आहे.

कोरोनोच्या याच पार्श्वभूमीवर पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व कोविड रुग्णालयातील डॉक्‍टरांना पीपीई किट व ग्रामीण भागातील जनतेसाठी तापमोजण्याचे यंत्र आणि च्यवनप्राशचे डबे राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या वतीने प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले. त्यांच्या वतीने कोरोनाबाधित रुग्णांना हाताळण्यासाठी 1200 पीपीई किट, तालुक्‍यातील जनतेसाठी 400 तापमान मोजण्याचे यंत्र आणि एक हजार च्यवनप्राशचे डबे देण्यात आले. प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. आर. पाटील उपस्थित होते.

यावेळी बोलताना गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून नागरिकांनी सतर्कता बाळगून स्वतःची काळजी घ्यावी. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन वेळोवेळी उपाययोजन करत असून नागरिकांनी यास सहकार्य करावे. रुग्णांचे बचावासाठी प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत असून नागरिकांनी घाबरुन जाण्याचे काही कारण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवड येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT