काही सुखद

दुचाकी रुग्णवाहिकांद्वारे आदिवासींना जीवनदान

पांडुरंग सरोदे

पुणे - गडचिरोलीतील दुर्गम भागात पायवाटेवरच गर्भवतींची होणारी प्रसूती...साप चावल्यानंतर रुग्णांना उपचारासाठी झोळीत टाकून करावा लागणारी पायपीट...अशा प्रसंगांना जिल्ह्यातील आदिवासी सामोरे जातात. हे चित्र बदलण्यासाठी आणि गरजू रुग्णांना तत्काळ उपचार उपलब्ध होण्यासाठी पुण्यातील आदर्श मित्रमंडळ व रोटरी क्‍लब पुणे वेस्टएंड चॅरिटेबल ट्रस्टतर्फे तीन दुचाकी रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत.  
धनकवडी येथील आदर्श मित्रमंडळातर्फे गेल्या काही वर्षांपासून अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील आदिवासींच्या उन्नतीसाठी काम हाती घेण्यात आले आहे. मंडळाने आता आरोग्यसेवा पुरविण्याकडेही लक्ष केंद्रित केले आहे. याअंतर्गतच ‘दुचाकी रुग्णवाहिका’ ही संकल्पना रोटरी क्‍लब पुणे वेस्टएंड चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने प्रत्यक्षात उतरविली जाणार आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासींना मलेरिया, हिवतापाबरोबरच विविध साथीचे आजार, प्रसूती, सर्पदंश, तसेच वन्यजीवांकडून होणाऱ्या हल्ल्यांना व अचानक उद्‌भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. रुग्णवाहिकेअभावी जिवावर उदार होऊन रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी आदिवासींना मोठी कसरत करावी लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर आदर्श मित्रमंडळाचे अध्यक्ष उदय जगताप यांच्या संकल्पनेतून ‘ई-अँब्युलन्स’ साकारण्यात आली आहे. सुदर्शन डोईफोडे यांनी त्याची निर्मिती केली. नितीन करंदीकर, महेश झुरळे व उदय कुलकर्णी यांचाही या उपक्रमाला हातभार लाभला आहे. 

जगताप म्हणाले, ‘‘दुर्गम भागात रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांना झोळीतून अथवा खांद्यावरून रुग्णालयापर्यंत नेण्याची वेळ आदिवासींवर येत आहे. हे चित्र बदलण्यासाठी आम्ही दुचाकी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. पोलिस मुख्यालयामध्ये अतिरिक्त पोलिस आयुक्त रवींद्र कदम व सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या हस्ते या रुग्णवाहिकांचे सोमवारी (ता. ४) सकाळी अकरा वाजता लोकार्पण करण्यात येणार असून, त्यानंतर त्या गडचिरोलीला पाठविण्यात येणार आहेत.’’ 

..अशी आहे रुग्णवाहिकेची वैशिष्ट्ये 
‘फर्स्टएड रुग्णवाहिका’वर एक बॉक्‍स ठेवून त्यामध्ये उपचारासाठी अत्यावश्‍यक साधने, औषधे ठेवता येणार आहेत. दुचाकीवरच बनविलेली ‘ट्रॉली अँब्युलन्स’ व ‘ई-अँब्युलन्स’मध्ये ऑक्‍सिजन सिलिंडर, स्ट्रेचर, फर्स्टएड बॉक्‍स, रक्तदाब तपासणी यंत्र, स्नेक स्टीक ठेवण्यात आली आहे. रुग्ण व एक नातेवाईक त्यामध्ये बसू शकतो. ‘ई-अँब्युलन्स’ ही पर्यावरणपूरक असून, ती ई रिक्षाच्या धर्तीवर बनविली आहे. बॅटरीवर चालणारी ही रुग्णवाहिका एकावेळी पन्नास किलोमीटर अंतर पार करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT