masvad 
काही सुखद

म्हसवडच्या श्री धनजीभाई नेमचंद ट्रस्टतर्फे कोविडसाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री निधीस 2.70 लाखांची मदत

सल्लाउद्दिन चोपदार

म्हसवड (जि.सातारा) : कोविड-19 साठी पंतप्रधान फंडात एक लाख 70 हजार रुपये व मुख्यमंत्री सहायता निधीत एक लाख रुपये असा एकूण दोन लाख 70 हजार रुपयांचा निधी येथील श्री धनजीभाई नेमचंद ट्रस्ट शहा परिवारातर्फे सुभाष हिराचंद शहा, अरिंजय नानचंद शहा, संजय नानचंद शहा यांनी येथील पालिकेचे मुख्याधिकारी सचिन माने, नगराध्यक्ष तुषार वीरकर, उपाध्यक्षा स्नेहल सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्त केला. विशेष बाब म्हणजे एक महिन्यापूर्वी या शहा परिवारातर्फे पंतप्रधान निधीसाठी भरघोस मदत केली होती. 

पालिकेच्या सभागृहामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून येथील शहा परिवाराने पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधी बॅंक एनएफटी मुख्याधिकारी सचिन माने यांच्याकडे सुपूर्त केले. यावेळी नगरसेवक गणेश रसाळ, शहाजी लोखंडे, गटनेते धनाजी माने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते युवराज सूर्यवंशी, डॉ. प्रमोद गावडे, कैलास भोरे आदी मान्यवरांसह येथील सकल जैन समाज म्हसवड व श्री सन्मती सेवा दल यांच्यातर्फे शहा परिवाराचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. 

यावेळी सकल जैन समाजाचे अध्यक्ष महावीर व्होरा, जैन समाजाचे उपाध्यक्ष महेंद्र, डॉ. राजेश शहा, सुकमार गांधी, भारत गांधी, भरत दोशी, अनिलकुमार देशमाने, जितेंद्र गांधी, सचिन देशमाने, चैतन्य देशमाने, प्रवीण दोशी, परेश व्होरा, संतोष दोशी, प्रीतम शहा आदी उपस्थित होते. 

पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीस मदत केल्याबद्दल मुख्याधिकारी माने, गणेश रसाळ यांनी शहा परिवारासह सकल जैन समाजाचे पालिकेच्या वतीने आभार मानले.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: घृणास्पद, आक्षेपार्ह आणि अश्लील कंटेंट; गडकरींची बदनामी करणाऱ्या पोस्ट हटवा, हायकोर्टाचे आदेश

रवि किशन यांना लेकीनेच केलं ट्रोल; रिव्हाचा भन्नाट Reel पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही, Viral Video

Amboli Tourist Accident : मुसळधार पाऊस अन् दाट धुक्यात धाडसी मोहीम! सह्याद्री रेस्क्यू टीमने 400 फूट खोल दरीतून बाहेर काढला निपाणीतील डॉक्टराचा मृतदेह

Marathi News Live Updates : तारळी धरणातून आज दुपारी २ वाजल्यापासून ९४५ क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

370 रुपयांच्या बिर्याणी वादानंतर प्रणित मोरेचं कमबॅक; पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'

SCROLL FOR NEXT