Satara Latest Marathi News 
काही सुखद

वावरहिऱ्यात मुलांकडून वृक्षसंवर्धनाचा वसा; लॉकडाउनमध्ये जगवली तब्बल अडीच हजार झाडे

सुनील शेडगे

नागठाणे (जि. सातारा) : मुले म्हणजे चैतन्याचा, उत्साहाचा आविष्कार. मुलांनी एखादी गोष्ट जर मनावर घेतली तर ती तडीस नेल्याशिवाय राहात नाहीत. याचीच प्रचिती देताना छोट्या मुलांनी वृक्षसंवर्धनाचा उपक्रम हाती घेतला. लॉकडाउनमुळे मिळालेल्या सुटीचा वेळ सत्कारणी लावत हा उपक्रम यशस्वी करून दाखविला. 

वावरहिरे (ता. माण) गावाला चोहोबाजूंनी डोंगर. माळरानाचे प्रमाणही मोठे. अशा स्थितीत गेल्या वर्षभरात येथे छोट्या मुलांकडून वृक्षसंवर्धनाचा उपक्रम सुरू आहे. पाच ते 14 वर्षे वयोगटातील ही मुले आहेत. लॉकडाउनमुळे या मुलांची शाळा बंद झाली. त्यांना वेळच वेळ मिळाला. साधारण जून महिन्याच्या मध्यावर मुलांनी पाणलिंग मंदिराच्या पाठीमागे असलेल्या माळरानावर, तेथील डोंगरावर करंजाच्या बिया टोकल्या. बियांतून बाहेर पडलेले अंकुर पाहून मुले खूष झाली. मित्रांच्या मदतीने त्यांनी करंजाच्या आणखी बिया गोळा करायला सुरुवात केली. दररोज एका डोंगरावर या पद्धतीने साधारण अडीच हजार बियांचे टोकण केले. त्यातील सतराशे ते अठराशे बियांना अंकुर फुटलेत. मुले रोज सायंकाळी डोंगरावर जमत. फुटलेल्या अंकुराभोवती आळी करत. संरक्षण म्हणून बाभळीच्या काट्या लावत. शेणखत आणून टाकत. यातून सुमारे पंधराशे झाडे चांगली तयार होती. 

मात्र, जसजसे ऊन वाढू लागले तसे त्यातील बरीचशी झाडे पाण्याच्या कमतरतेमुळे सुकून गेली. त्यामुळे मुले काहीशी हिरमुसली. मात्र, जगलेल्या झाडांना कसोशीने जगवण्याचा निर्धार त्यांनी केला. त्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्या गोळा करून त्यांनी त्या झाडांच्या शेजारी जमिनीत पुरल्या. त्या बाटल्यांत पाणी ओतून झाडे जगविण्याचा प्रयत्न केला. पाणी आणून मुले झाडांना जगवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या अडीचशे ते तीनशे झाडे जगविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या मुलांना विविध स्तरांतून मदतही मिळत आहे. बहुतेक पालक आपल्या मुलांचे झाडांसोबतचे फोटो व्हॉट्‌सऍपच्या स्टेटसवर ठेवून त्यांना प्रोत्साहन देत आहेत.

गेले वर्षभर ही मुले मोठ्या मेहनतीने, चिकाटीने झाडांची काळजी घेत आहेत. उन्हाळ्याचे हे दोन महिने कसोटीचे ठरणार आहेत. त्यानंतर या उजाड डोंगरावर शंभर ते दीडशे झाडे आनंदाने डोलताना दिसतील, असा विश्वास आहे. 

-नितीन यादव, मुलांचे मार्गदर्शक, वावरहिरे (ता. माण) 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protests: नेपाळची संसद विसर्जित; सुशीला कार्की अंतरिम पंतप्रधान

Shiv Sena UBT Demand : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंच्या पक्षाने केली मोठी मागणी!

SSC Exam Form : दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून होणार सुरू

Vasmat Heavy Rain : वसमतला ढगफुटी सदृश्य पाऊस! शेतशिवाराला नद्यांचे स्वरूप; आखाडे गेले वाहून, पाच गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates Live : न्यायाधीशांच्या कारला आग, सुदैवाने इजा नाही

SCROLL FOR NEXT