Satara Latest Marathi News 
काही सुखद

राज्यस्तरीय रौप्यपदक विजेत्या अस्मिताच्या धनुर्विद्येला 'कूपर'चे बळ

दिलीपकुमार चिंचकर

सातारा : येथील औद्योगिक विकासात मोलाचे योगदान देतानाच येथील कूपर इंडस्ट्रीज सामाजिक बांधिलकीही जपत विविध संस्था, शाळा, महाविद्यालयांना मदत करत आहे. आता साताऱ्याच्या मातीतून उत्कृष्ट खेळाडू घडावेत, यासाठी येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील अस्मिता सावंत हिला धनुर्विद्येचे महागडे साहित्य घेता यावे, यासाठी 50 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. 

अस्मिता सावंत ही उदयोन्मुख खेळाडू आहे. लहानपणापासून तिला खेळांची मोठी आवड. शिक्षण घेताना तिने धनुर्विद्या या क्रीडा प्रकारावर लक्ष केंद्रित केले. मात्र, या खेळाचे साहित्य फारच महाग आहे. महाविद्यालयाने तिला मदत करत सतत प्रोत्साहन दिले. अस्मितानेही महाविद्यालयाच्या मदतीचे चिज केले. धुळे आणि इस्लामपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत तिने रौप्यपदक मिळविले. महाविद्यालयाने तिला खेळाचे चांगले साहित्य मिळावे, यासाठी सतत प्रयत्न केले. मात्र, नवीन आधुनिक साहित्य मिळण्याइतकी मदत होत नव्हती. 

अखेर प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, जिमखाना प्रमुख प्रा. विनायक भोई यांनी कूपर इंडस्ट्रीजकडे धाव घेतली. कूपर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक फरोख कूपर, ह्युमन रिसोर्सचे मुख्य अधिकारी नितीन देशपांडे यांना वस्तुस्थिती सांगितली. श्री. कूपर आणि देशपांडे यांनी साताऱ्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या अस्मिताला पाठबळ देण्याचे ठरविले. तिला या खेळासाठी 50 हजार रुपयांची मदत केली. आता या मदतीतून अस्मिताला धनुर्विद्येचे दर्जेदार आणि आधुनिक साहित्य मिळू शकणार आहे. या मदतीबद्दल कूपर इंडस्ट्रीजचे प्राचार्य डॉ. शेजवळ यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Girl Period Problems: बाहेरून मुलगी, आतून मुलगा? १७ वर्षांची झाली तरी पीरियड्स आले नाही म्हणून तपासणी केली अन् सत्य आलं समोर

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

'एक दिवाने की दिवानियत' चित्रपटाच्या डबिंगदरम्यान रडला हर्षवर्धन राणे

Latest Maharashtra News Updates : गोंदियाच्या उच्चेपूर गावात सुरू होणाऱ्या बिअर बारला ग्रामस्थांचा विरोध

SCROLL FOR NEXT