काही सुखद

घरची परिस्थिती बेताची असलेल्या आकाशच्या मदतीला धावला 'हनुमान'

अशोक सस्ते

आसू (जि. सातारा) : खटकेवस्ती (ता. फलटण) येथील आकाश रामभाऊ बागाव यांच्या शस्त्रक्रियेसाठी गोखळी (ता. फलटण) येथील जय हनुमान दहीहंडी संघाने 15 हजार रुपयांची मदत केली. या मदतीमुळे जय हनुमान दहीहंडी संघाचे परिसरातून कौतुक होत आहे. 

खटकेवस्ती येथील आकाश बागाव यांच्या पायावर पुणे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आकाशच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने दवाखान्यातील मोठा खर्च करणे कठीण झालेले असताना गोखळी येथील जय हनुमान दहीहंडी संघ त्यांच्या मदतीसाठी धावून गेला आहे. संघाच्या वतीने आकाशच्या कुटुंबीयांना रोख 15 हजार रुपयांची मदत करण्यात आली. या मदतीबद्दल जय हनुमान दहीहंडी संघाचे परिसरातून कौतुक होत आहे. 

जय हनुमान दहीहंडी संघाने तालुक्‍यासह अन्य भागांतील अनेक ठिकाणची दहीहंडी फोडण्याचा मान पटकावलेला आहे. त्यामधून संघाला बक्षिसांची चांगली कमाई झाली आहे. आकाश हा दहीहंडी संघाचा सदस्य आहे. त्यामुळे राखीव कमाईतूनच संघाने आपल्या सदस्याच्या बागाव कुटुंबीयांना 15 हजार रुपयांची मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. गोखळी ग्रामपंचायतीचे सदस्य सागर गावडे यांच्या हस्ते ही मदत बागाव कुटुंबीयांकडे सुपूर्त करण्यात आली. बागाव कुटुंबीयांनी दहीहंडी संघाच्या सर्व सदस्यांचे आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

Central Railway: कर्जत-खोपोली प्रवास आरामदायी होणार, १५ डब्यांच्या लोकल धावणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; पाहा वेळापत्रक

Kailas Patil : ‘ऑपरेशन टायगर’चा दुसरा भाग? कैलास पाटील शिंदे गटात जाणार?

अभिजीत खांडकेकरची मेहुणी आहे ही मराठी अभिनेत्री; गाजवतेय मालिका; म्हणते- माझ्या लग्नात त्यांनी खुर्च्या उचलल्यात...

Marathi News Live Updates : आज स्वातंत्र्यदिनी अमृतसरमधील अटारी-वाघा सीमेवर 'बीटिंग रिट्रीट' समारंभ पार पडला

SCROLL FOR NEXT