काही सुखद

तीस वर्षांपासून जगण्याची लढाई लढणाऱ्या अनाथांना 'चैतन्य'चा आधार

फिरोज तांबोळी

गोंदवले (जि. सातारा) : सुमारे 30 वर्षांपासून जगण्याची लढाई लढणाऱ्या पानवण (ता. माण) येथील अपंग व अनाथांसाठी गोंदवले बुद्रुकच्या श्री गणुचैतन्य सामाजिक विकास संस्थेने मदतीचा हात दिला. उमाकांत सामाजिक विकास संस्थेच्या विनाअनुदानित शाळा व वसतिगृहातील मुलांसाठी संपूर्ण शिधा देऊन गोंदवलेकरांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. 

पानवण येथील तोरणे कुटुंबीय गरीब, अनाथ आणि अपंग मुलांसाठी ज्ञानदानाचे काम करतात. उमाकांत सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमामातून अध्यक्षा रमाताई व त्यांचे पती सखाराम तोरणे हे अविरतपणे झटत आहेत. शासनाकडून कोणतेही अनुदान मिळत नसल्याने दानशूरांच्या मदतीवरच हे कार्य सुरू आहे. या दुर्लक्षितांना मदतीचा हात देण्यासाठी गोंदवले बुद्रुक येथील श्री गणुचैतन्य संस्था सरसावली.

गेल्या दोन वर्षांपासून श्री ब्रह्मचैतन्य महाराज मोफत दिंडी सोहळा सुरू करून या वारकऱ्यांनी स्वखर्चातून मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातूनच पानवणच्या संस्थेला महिनाभर पुरेल इतके अन्नधान्य देण्याचे निश्‍चित करण्यात आले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चातूनच त्यासाठी पुढाकार घेतला. संस्थेचे अध्यक्ष निवृत्ती कट्टे, उपाध्यक्ष बापूराव कट्टे, सुरेश पाटोळे, अरुण कट्टे, गुरुनाथ पाटील, अनिल भोसले, हेमंत हास्पे, संजय कावळे, दादासो कट्टे, रामभाऊ कट्टे आदींनी पानवण येथे जाऊन ही मदत तोरणे दांपत्याकडे सुपूर्त केली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Spy Camera Allegation : पुण्यात शिक्षक-पदवीधरच्या मतदानात भाजपकडून स्पायकॅमचा आरोप, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; सुप्रिया सुळेंच्या आरोपाने खळबळ

दिवाळीला सुट्टी मागताना काळजी घ्या! WhatsApp वर बॉसचा OK मेसेज म्हणजे रजा मंजूर नव्हे; कर्मचाऱ्याची याचिका फेटाळली, प्रकरण काय?

Jarange Audio Clip: ''500 कोटींचं सोडा.. जरांगे पाटलांच्या विरोधात नेमकं चाललंय काय?'', राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, जवळची माणसं फोडून...

Marathi News Live Updates:साताऱ्यात मतदानादरम्यान मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि शशिकांत शिंदे समोरासमोर, हस्तांदोलनासह मिश्किल टोलेबाजीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Vastu Tips: दिवाळीपूर्वी घरात रंगकाम करताय? चुकीचा रंग आणू शकतो गरिबी! घर रंगवताना नक्की पाळा वास्तूचे 'हे' नियम...

SCROLL FOR NEXT