Satara Latest Marathi News Satara News 
काही सुखद

'मुलांचे आरोग्य, ही प्रत्येक आई-वडिलांची काळजी'; पाचगणीत गरजूंना मायेची ऊब

सुनील कांबळे

पाचगणी (जि. सातारा) : मित्रत्व, सामाजिक कार्य आणि एकात्मता अशा त्रिवेणी संगमाचे ब्रीदवाक्‍य उराशी बाळगून उदयास आलेल्या पाचगणी इनरव्हील क्‍लबने राजापुरी (ता. सातारा) येथील नव इंग्लिश स्कूलच्या गरजू विद्यार्थ्यांना टॉवेल, साबण वाटप करून क्‍लबच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. 

बोरणे (ता. सातारा) येथील तपोवन आश्रमात दादाजी फाउंडेशन व इनरव्हील क्‍लबच्या वतीने दादाजींच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित सोहळ्यामध्ये पाचगणी इनरव्हील क्‍लबच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. नूतन अध्यक्षा कल्पना पुरोहित म्हणाल्या "मुलांचे आरोग्य ही प्रत्येक आई-वडिलांची काळजी असते. त्यामध्ये पाल्यांचे दैनंदिन शेड्युल फार अस्तव्यस्त झाले आहे. अभ्यास व वेगवेगळ्या उपक्रमांत विद्यार्थी गुरफटून गेले आहेत. त्यातच व्हायरल इन्फेक्‍शन अनेकदा डोके वर काढते व अशा वेळी विद्यार्थ्यांनी स्वछता राखून आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे व याच अनुषंगाने साबण व टॉवेलचे वाटप करत आहोत.'' रौप्यमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असलेल्या पाचगणी रोटरी क्‍लबचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून व त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन आम्ही इनरव्हील क्‍लबची मुहूर्तमेढ रोवली असून, या कार्यक्रमाने कार्याचा श्रीगणेशा केल्याचे सचिव संगीता पाटील यांनी सांगितले. 

महाबळेश्वर इनरव्हील क्‍लबच्या अध्यक्षा दीपा गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने पाचगणी इनरव्हील क्‍लबची उभारणी गतीने झाल्याचे विनिता सक्‍सेना म्हणाल्या. नूतन खजिनदार मनीषा शिंदे यांनी विविध कोर्सेसविषयी माहिती दिली. ट्रस्टचे अध्यक्ष किरण गावंड यांनी स्वागत केले. कार्यक्रमास सुजाता मुळे, अपर्णा पिसाळ, सुषमा पवार, विनिता सक्‍सेना, दादाजी फाउंडेशनचे पदाधिकारी, अनुयायी व नातेवाईक उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT