Satara Latest Marathi News 
काही सुखद

बामणोलीत आडाच्या पाणवठ्यावर 'स्वच्छता'; सरपंचांच्या अनोख्या मोहिमेची सर्वत्र चर्चा

सुनील शेडगे

नागठाणे (जि. सातारा) : ग्रामीण भागात महिला अन्‌ पाणी हे तसे अतूट समीकरण. पाणीटंचाई हा केवळ शब्दही महिलांना काळजीत पाडणारा. त्यामुळेच पाण्याचा प्रश्न बिकट होण्याच्या मार्गावर असताना महिला सरपंचांनी पहिले प्राधान्य दिले ते याच गोष्टीला. स्वतः पुढाकार घेत त्यांनी आपल्या कामाचा आरंभ केला तो पाणवठ्याच्या स्वच्छतेने. 

जयश्री लक्ष्मण गोरे या जावळी तालुक्‍यातील बामणोली गावच्या सरपंच. बामणोली ही गट ग्रामपंचायत. बामणोलीसह साईनगर, सावरी, म्हावशी या गावांचा ग्रामपंचायतीत समावेश होतो. गोरे यांनी दहा वर्षांपूर्वीही गावचे सरपंचपद भूषविले आहे. कार्यतत्पर सरपंच असा लौकिक मिळविला. त्यामुळे या वेळी पुन्हा एकदा पदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडली. त्या म्हावशी गावच्या रहिवासी. त्यांच्या गावात पहिलीच समस्या उभी राहिली ती पाण्याची. गावात गुरुत्वाकर्षण पध्दतीने पाणीपुरवठा होतो.

सध्याच्या उन्हाळ्याच्या तोंडावर येथील झऱ्याचे पाणी खूपच कमी झाले. गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. यावर उपाय म्हणून गोरे यांनी ओढ्यालगत असणाऱ्या "आड' नावाच्या पाणवठ्यावर स्वच्छता मोहीम राबविण्याचे ठरविले. त्यासाठी गावातील ग्रामस्थ विशेषतः महिला, युवक यांना प्रेरित केले. सर्वांनी एकत्र येत सुमारे पाच तास श्रमदान केले. जवळपास तीन ट्रॉली गाळ काढला. उल्लेखनीय म्हणजे कोणत्याही निधीची वाट न पाहता प्रत्यक्ष कामावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. याकामी प्रकाश सुतार, विष्णू सूतार, महेंद्र शिंदे, मनोज आगुंडे, लक्ष्मण शिंदे, अंकुश उतेकर आदींचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले. 

शेतकऱ्याच्या पोराची उत्तुंग भरारी; सातारच्या अनिकेतची लेफ्टनंटपदी निवड

लोकसहभागामुळे पाण्याचा प्रश्न सुटण्यास हातभार लागला. सर्वांचेच प्रयत्न सार्थकी लागले. कामाचे चीज झाले, याचे समाधान वाटते. 

-जयश्री गोरे, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत बामणोली (कसबे), ता. जावळी

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT