Satara Latest Marathi News, Satara News 
काही सुखद

समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी नेहमीच पुढाकार; सहकारमंत्र्यांचा 'एहसास'ला विश्वास

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : इफको संस्थेमार्फत वळसे (ता. सातारा) येथील एहसास मतिमंद मुलांच्या बालगृहास सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले. 

सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था इफकोमार्फत चालविला जाणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून, समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी अशा प्रकारचे आणखी कार्यक्रम राबवावेत, असे प्रतिपादन मंत्री श्री. पाटील यांनी केले. शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचा खत पुरवठा करण्यासोबत सामाजिक कार्यक्रमांमध्येदेखील अग्रेसर असणाऱ्या इफको या संस्थेमार्फत यावर्षी थंडीमध्ये भारतातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा ब्लॅंकेट वितरणाचा कार्यक्रम राबविला जातो आहे, अशी माहिती क्षेत्र अधिकारी संदीप रोकडे यांनी दिली.

त्याअंतर्गत "एहसास' या बालगृहामध्ये मतिमंद आणि अनाथ विद्यार्थ्यांचे संगोपन शिक्षण आणि सर्वांगीण सुधारणा गेली 14 वर्षे केली जात आहे. संस्थेचे संस्थापक संजय कांबळे हे कोणत्याही शासकीय अनुदानाव्यतिरिक्त ही संस्था अतिशय चांगल्या प्रकारे चालवत आहेत. त्यामुळे त्या संस्थेतील मुलांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. सह्याद्री कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी मोहनराव पाटील, इफकोचे जिल्हा क्षेत्र अधिकारी श्री. रोकडे, बालगृहाच्या रजनी कांबळे आणि अश्विनी लोहार उपस्थित होत्या. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT