Satara 
काही सुखद

सातारा ः जवानांकडून "क्वारंटाइन'मध्येही आगळी कृतज्ञता

सकाळ वृत्तसेवा

अंगापूर (जि. सातारा) ः वर्णे (ता. सातारा) गावातील तीन जवान चार दिवसांपूर्वी दिल्ली येथून गावात दाखल झाले आहेत. परंतु, घरी न जाता त्यांनी गावातील प्राथमिक शाळेतील विलगीकरण कक्षात स्वत: दाखल होऊन 14 दिवसांसाठी क्‍वारंटाइन करून घेतलेले असून, तेथे ते दररोज शाळेची स्वच्छता करून शाळेप्रती आगळी कृतज्ञता व्यक्त करत आहेत. 

श्रीकांत पवार (सीआयएसएफ), अतुल यादव (बीएसएफ) व सागर बर्गे (आयटीबीएफ) हे तीन जवान महिन्याच्या हक्काच्या सुटीवर गुरुवारी (ता.21) दिल्ली येथून गावात आले. गावात येताच त्यांनी प्राथमिक शाळेत स्वत:ला 14 दिवसांसाठी विलगीकरण करून घेतले. प्रशासनाच्या सर्व सूचनांचे व नियमांचे पालन करत मागील चार दिवसांपासून ज्या गावच्या 
प्राथमिक शाळेने आपल्याला उत्तम शिक्षण, संस्कार व समाजात वावरण्याची उत्तम जाण दिली, त्याच शाळेच्या ऋणातून उतराई होण्याची व कृतज्ञतेची संधी मिळाल्याचा भाव त्यांच्या मनी दिसून आला.

विलगीकरणाच्या काळात शाळेचा संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्याचा उपक्रम या तिघांनी सुरू केला असून, त्याचबरोबर विलगीकरण कक्ष, शाळेचा व्हरांडा पाण्याने रोज धुवून काढणे, संपूर्ण परिसराची झाडलोट करणे तसेच या ठिकाणच्या झाडांना हातपंपाचे पाणी घालणे असा दिनक्रम सुरू केला आहे. सकाळी आठ ते दहा व सायंकाळी पाच ते सात या वेळेत हे काम करत आहेत. दुपारी जेवणानंतर विश्रांती घेत आपल्या शालेय जीवनातील सवंगड्याच्या आठवणी काढत जुने दिवस आणि त्यावेळचे शिक्षक, शिक्षण व मौजमजा यांना उजाळा देत आपला वेळ व्यतित करत आहेत. विलगीकरण काळातील या आठवणी आम्हाला पुढील आयुष्यात निश्‍चितच प्रेरणा देत राहतील, असे या तिघांनी यावेळी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smart Meter Maharashtra : स्मार्ट मीटरला विरोध करणाऱ्या ग्राहकाकडेच वीजचोरी उघड; शिरोळ तालुक्यात धक्कादायक प्रकार

Gwalior Road Development : रस्ता बांधून पुन्हा खोदला तर बिल रोखणार; सरकारने ठेकेदारांना भरला दम, 'एक रुपयाही मिळणार नाही'

Ganesh Chaturthi 2026: फिल्मी अवतार की शास्त्रोक्त रूप? गणेश चतुर्थीला कशी असावी बाप्पाची मूर्ती? जाणून घ्या नियम!

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

पुण्यात वाहतुकीत मोठे बदल, अनेक रस्ते बंद; पर्यायी मार्ग कोणते? खरेदीला गेल्यावर पार्किंग कुठे करायचं? वाचा सविस्तर अपडेट्स

SCROLL FOR NEXT