काही सुखद

Positive News: सौरऊर्जेने उजळली डोंगरवस्तीवरील घरे 

किरण भदे - सकाळ वृत्तसेवा

नसरापूर - वेल्हे व भोर तालुक्‍यातील पश्‍चिम पट्ट्यातील दुर्गम गावांच्या वीज नसलेल्या धनगर समाजाच्या दुर्गम डोंगरवस्तीवरील घरे सौरउर्जेने उजळली आहेत. यासाठी पुढाकार घेणाऱ्या तानाजी कचरे या तरुणास महाऊर्जाची साथ लाभली आहे. कचरे यांच्या भगीरथ प्रयत्नांमुळे आत्तापर्यंत दोन्ही तालुक्‍यातील आठ गावातील 65 वस्त्या प्रकाशमान झाल्या आहेत. 

वेल्हे तालुक्‍यात दुर्गम व विरळ वस्त्यावर धनगर व इतर समाज मोठ्या प्रमाणावर राहतो. अशा वस्तींसाठी ही योजना उपयोगी ठरत आहे. मेटपिलावरे गावच्या ग्रामपंचायत सदस्या अंजना कचरे यांचे पती सामाजिक कार्यकर्ते तानाजी कचरे यांना या योजनेबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी सर्वप्रथम गावच्या धनगर वस्तीवरील 13 घरांसाठी या योजने अंतर्गत सौरऊर्जा प्रकल्प राबवला. ज्या ज्या ठिकाणी वीज पोहचलेली नाही त्या ठिकाणी जाऊन तेथील नागरिकांच्या वतीने महाऊर्जाच्या पुणे येरवडा येथील कार्यालयात या बाबत पाठपुरावा करून अनेक वस्त्या प्रकाशमान केल्या. यासाठी त्यांना वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता शैलेश गिते, महाऊर्जाचे अधिकारी अनिल जोशी, हर्षित बुनगे यांनी सहकार्य केले. 

वैयक्तिक घरा बरोबरच ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरे आहेत तिथे वीज पोहचू शकत नाही आशा ठिकाणी देखिल मायक्रो ग्रीड प्रोजेक्‍ट अंतर्गत सर्व घरांसाठी सौरऊर्जेचा एकच कॉंमन प्लॅंन्ट लावला जातो व प्रकाश प्रत्येक घरात पोहचवला जातो ही योजना देखिल पूर्ण मोफत आहे. 

असा आहे उपक्रम 
वीजवितरण कंपनीची वीज जिथे पोहचत नाही, अशा दुर्गम ठिकाणची घरे देखील प्रकाशमान व्हावीत यासाठी, "हर घर बिजली' या उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या निधीमधून सौभाग्य योजनेद्वारे महाऊर्जाच्या वतीने दुर्गम भागातील घरांना पाच एलईडी बल्ब एक टेबल फॅन व मोबाईल चार्जिंग युनिट व छतावर ठेवावयाचा सौरऊर्जा पॅनेल व बॅटरी सहित कंट्रोलर संच मोफत दिला जातो, यासाठी केंद्र शासन निधी देते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या गावांना फायदा 
वेल्हे तालुक्‍यातील 58 घरे 
मेटपिलावरे - 13 
हारपुड - 4 
पाल बुद्रूक - 1, 
खानू - 16, केळद - 8, 
पाबे - 16 घरे 
भोर तालुक्‍यातील 7 घरे 
गुहिणी - 5 
खुलशी - 2 घरे 

ज्या घरा मध्ये वीज वितरण कंपनीची वीज पोहचू शकत नाही. त्यासाठी केंद्र शासनाची ही सौभाग्य योजना मोफत आहे. वेल्हे तालुक्‍यात दुर्गम डोंगर भागात ज्या ठिकाणी एक किंवा दोन घरे आहेत तेथे वीज पोहचणे फारच खर्चिक आहे. अशा ठिकाणी सौभाग्य योजनेतून सौरऊर्जा दिली आहे. 
- हर्षित बुनगे, प्रकल्प व्यवस्थापक, महाऊर्जा पुणे 

गेली अनेक वर्ष अशी वस्तीवरील घरे अंधारातच आहेत. त्यांना या योजनेमधून प्रकाश मिळाल्याने खऱ्या अर्थाने त्यांनी या वर्षी दिवाळी साजरी केली आहे. पूर्ण मोफत असलेल्या या योजनेचा दुर्गम भागातील नागरिकांनी लाभ घ्यावा. 
- तानाजी कचरे 

हेही वाचा : 74 वर्षांच्या आईची लाख मोलाची साथ; लेकीनं पेरुत कमावले 2 लाख

या योजनेसाठी निकष 
* लाभार्थ्यांची वस्ती किंवा घर हे दुर्गम ठिकाणी हवे 
* वितरण कंपनीची वीज पोहचणे अवघड आहे असे ठिकाण, 
* खर्च जास्त होतो अशा ठिकाणी योजना राबवली जाते 
* प्रस्तावाचे महाऊर्जा कर्मचाऱ्यांकडून सर्व्हेक्षण केले जाते 

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे 
* सौरऊर्जा बसवण्यासाठी ग्राम पंचायतीचा ठराव 
* ज्या घरासाठी बसवायचे आहे त्या घराचा आठ अचा उतारा 
* वीज वितरण कंपनीचा वीज पोचू शकत नाही असा दाखला. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: लॉकी फर्ग्युसनने तोडली रचिन-रहाणेची पार्टनरशीप, चेन्नईला तिसरा धक्का

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT