परभणी - समीर शेख यांच्यासह त्याचे वडील मुसा शेख सोबत आई व बहिण.
परभणी - समीर शेख यांच्यासह त्याचे वडील मुसा शेख सोबत आई व बहिण. 
काही सुखद

#TuesdayMotivation : नववीच्या मुलाने बनवलाय 'स्मार्ट' ट्रक

सकाळ वृत्तसेवा

परभणी - नवे काही करण्याची धडपड, जगातील नवनवीन आविष्कारांचा अभ्यास, तज्ज्ञांचा सहवास याच्या जोरावर परभणीतील नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने स्मार्ट ट्रक बनविला आहे. यामधील वेगळेपणा हा त्याच्यात असलेल्या फीचरमुळे दिसतो. शेख समीर शेख मुसा असे या मुलाचे नाव असून, त्याने तयार केलेल्या स्मार्ट ट्रकची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे.

परभणीतील दर्गारोड परिसरातील आजम कॉलनीतील रहिवासी असलेले शेख मुसा यांचा मुलगा शेख समीर हा शहरातील क्विन्स इंग्लिश स्कूलमध्ये नववीत आहे. लहानपणापासूनच समीरला वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचा छंद होता. त्याचे या सर्व गोष्टी तयार करण्यात मन रमत असे. त्याच्यातील कौशल्य ओळखून आई- वडिलांनी त्याला सातत्याने प्रोत्साहन दिले. यातून समीरने स्मार्ट ट्रक बनविला आहे. हा ट्रक इतर ट्रकसारखा दिसत असला तरी त्याच्यातील वेगळेपण त्याला "स्मार्ट' बनवतं. समीर शेखला या ट्रकबद्दल प्रचंड उत्सुकता होती. त्याने दोन वर्षांपासून यावर काम करण्यास सुरवात केली होती. त्यासाठी त्याने इंटरनेटच्या साहाय्याने माहिती गोळा करून या ट्रकची निर्मिती केली आहे. अपघातांना आळा बसण्याच्या उद्देशाने त्याचा हा प्रयोग कौतुकास्पद ठरत आहे.

ट्रकमध्ये काय वेगळे?
1. अल्कोहोल सेन्सर - समीर शेखने तयार केलेल्या ट्रकमध्ये तीन वेगवेगळे सेन्सर बसविण्यात आले आहेत. चालक मद्यसेवन करून ट्रक चालवत असेल, तर अल्कोहोल सेन्सर तातडीने ट्रकची गती कमी करेल व काही सेकंदांतच ट्रक बंद पाडेल.
2. रस्त्यावरील अडथळे ओळखणे - भरधाव जात असेल आणि समोर काही अंतरावर मोठा अडथळा असेल तर ट्रकची गती कमी होईल, मोकळी जागा असेल अशा दिशेला तो आपोआपच वळेल.
3. एलडीआर - यामध्ये एलडीआर नावाची यंत्रणा काम करते, त्यामुळे अंधार पडला की ट्रकचे फॉगलॅंप कार्यान्वित होतात.
4. गॅस सुरक्षा सायरन - गॅस सिलिंडर वाहतूक करताना गॅस लिकेज झाल्यास ट्रकमधील सायरन त्वरित वाजतो. चालकाला सावध होता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT