Two Ventilator Machines Transferred To Two Hospitals By Manufacturers Association Of Satara.jpg 
काही सुखद

'मास'कडून दोन व्हेंटिलेटरचे लोकार्पण

उमेश बांबरे

सातारा : कोरोनाच्या काळात मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन ऑफ साताराने केलेल्या आवाहनाला उद्योजकांनी दिलेल्या प्रतिसादातून दोन व्हेंटिलेटर मशीन दोन हॉस्पिटलना हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. मासचे अध्यक्ष उदय देशमुख व उपाध्यक्ष राजेंद्र मोहिते यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा नुकताच झाला.

मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन ऑफ साताराने (मास) उद्योजकांच्या सहकार्याने लोकोपयोगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. पूरस्थिती असो अथवा कोविड-19. जिल्ह्यातील लहानापासून मोठा उद्योग असलेले उद्योजक कायम समाजाच्या व प्रशासनाच्या मदतीला धावून जात असतात. कोविड-19 विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लवकर सुधारावी, यासाठी सर्व उद्योजक प्रशासनास असोसिएशनमार्फत अथवा आपापल्या परीने वस्तू व आर्थिक स्वरूपात मदत करत आहेत.
 
कोविड-19 विषाणूमुळे वाढती रुग्णसंख्येची दखल घेऊन मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशनने उद्योजकांना मदतीचे आवाहन केले होते. त्या उत्स्फूर्त सहभागातून जमा झालेल्या देणगीमधून मासतर्फे दोन व्हेंटिलेटर मशीन उपलब्ध करण्यात आल्या. या मशीन मंगलमूर्ती क्‍लिनिक व साईअमृत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्याकडे मासचे अध्यक्ष उदय देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र मोहिते व सचिव धैर्यशील भोसले यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या. 

यावेळी मासचे खजिनदार भरत शेठ, मास सहसचिव दीपक पाटील, ज्येष्ठ उद्योजक दिलीप उतकूर, उद्योजक दत्ताजी थोरात, प्रसन्न देशमुख, तसेच पदाधिकारी, उद्योजक उपस्थित होते.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

RCB vs SRH Live : पहिल्याच सामन्यात वाद... हेनरिच क्लासन अम्पायरच्या निर्णयावर नाराज... काव्या मारनही भडकली, सॉल्टच्या कॅचवर शंका?

SCROLL FOR NEXT