कोळे - जिजाऊ अनाथाश्रमात समीर नदाफ यांच्याकडे भेटवस्तू देताना डॉ. सुशील घोगरे, अशोकराव पाटील पोतलेकर व मित्रपरिवार.
कोळे - जिजाऊ अनाथाश्रमात समीर नदाफ यांच्याकडे भेटवस्तू देताना डॉ. सुशील घोगरे, अशोकराव पाटील पोतलेकर व मित्रपरिवार. 
काही सुखद

‘जिजाऊ’च्या लेकरांना हवे दातृत्वाचे बळ!

सकाळवृत्तसेवा

विंग - अत्यंत बेताच्या परिस्थितीवर मात करत कोळे (ता. कऱ्हाड) येथील समीर नदाफ यांनी १८ अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारले आहे. जिजाऊ अनाथ आश्रमाच्या माध्यमातून गेली दोन वर्षे ते ही जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र, त्या मुलांना आज खरी गरज आहे समाजातून आर्थिक मदतीची व दातृत्व दाखवणाऱ्या व्यक्तीची.

सध्याच्या जीवन धक्काधकीचे झाले आहे. त्यामध्ये कुटुंब चालविताना अनेक संकटांशी तोंड द्यावे लागत असते. अनाथ व भीक मागणाऱ्यांच्या बाबतीत साधी सहानुभूतीही दाखवली जात नाही. अशा परिस्थितीत समीर नदाफ कुटुंबीय त्याला अपवाद आहेत. त्यांची घरची परिस्थिती बेताची असताना मात्र त्यावर मात करत त्यांनी १८ अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारले. नदाफ कुटुंबीय गाद्या दुरुस्ती व्यवसाय करते. अतिशय बेताच्या परिस्थितीत आई- वडील, पत्नी व मुले एकत्रित परंपरागत व्यवसाय करत आहेत. त्यासाठी साताऱ्यासह अन्य जिल्ह्यात ते फिरतात. सांगली, मिरज बसथांब्यावर भीक मागत फिरताना काही अनाथ मुले त्यांना आढळल्या. त्यांनी त्याचा सांभाळ करण्याचे ठरविले अणि कायदेशीर पोलिसांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले. त्याला आज दोन वर्षे झाली. त्यासाठी कोळेत जिजाऊ सेवाभावी संस्थेच्या नावाने अनाथाश्रम सुरू केला. त्याची नोंदणीही केली. आश्रमात सध्या दोन ते ११ वयोगटातील दहा मुली व आठ मुले आहेत.

नदाफ कुटुंबीय त्यांचे पालनपोषण करत आहेत. त्यांना शिक्षणही देत आहेत. तीन मुले नजीकच्या माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत आहेत. अन्य जिल्हा परिषद व अंगणवाडीत आहेत. प्रसंगी त्या मुलांचे उत्साहात वाढदिवस ते साजरे करतात. सौ. नदाफ मुलांचा नाष्टा, जेवण, कपडे, धुणी- भांडी करतातच, तर आई- वडील त्यांना आंघोळ घालतात. समीर नदाफ स्वतः त्यांची अभ्यासिका घेतात. बंधू शकील यांचे योगदान मिळते. केवळ गाद्या दुरुस्ती व्यवसायातून अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारून जबाबदारीने ते पेलत आहेत. सामाजिक बांधिलकी जपत इतरांपुढे दातृत्वाचा आदर्श त्यांनी ठेवला आहे. हल्‍ली या मुलांचा खर्च वाढू लागल्याचे ते सांगतात. नदाफ कुटुंबीयांना त्यासाठी झगडावे लागत आहे. समाजातून येणारी तुटपुंजी मदतही आपुरी पडू लागली आहे. समाजात अनेक दानशूर व्यक्ती आहेत. त्या अनाथ मुलांना खरी गरज त्यांची आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मदत 
कोळेतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सुशील घोगरे व त्यांच्या मित्र परिवाराने आनाथाश्रमास नुकतीच भेट देऊन रोख रक्कम, जीवनाश्‍यक वस्तू त्यांना भेट दिल्या. शैक्षणिक साहित्य दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Onion Export News : कांदा निर्यातबंदी केंद्राने उठवली पण भाव वाढ होणार का?

IPL 2024, GT vs RCB Live Score: फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस, मॅक्सवेलचं झालं पुनरागमन; जाणून घ्या गुजरात-बेंगळुरूची प्लेइंग-11

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : अभिनेता साहिल खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT