काही सुखद

आत्महत्याग्रस्त तिरझड्यातील मुले स्पर्धा परीक्षांच्या वाटेवर

राजकुमार भीतकर

तिरझडा (जि. यवतमाळ) - १,२५० लोकवस्तीचे चिमुकले गाव. पण, तब्बल ४३ शेतकरी आत्महत्या. अपार दुःख पेलत जगणारे हे गाव. कुणाचा बा गेला, तर कुणाचा भाऊ. कुणाचा अख्खा संसार उद्‌ध्वस्थ झाला. ओसरीत-अंगणात वेदनेचा अंतहीन काळोख. पण, तो दूर सारण्यासाठी आता येथे काजवे जमा झालेत. हे काजवे आहेत कपाळवरचं कुंकू पुसलेल्या महिला आणि आधार हरविलेले तरुण. नभी झेपावण्याचा निश्‍चय त्यांनी केला आहे. 

तिरझडा हे ते गाव. तालुका कळंब, जि. यवतमाळ. गेल्या डिसेंबरमध्ये येथील महिला नागपूर येथे ‘सकाळ पेंडॉल’मध्ये आपले प्रश्‍न मांडण्यासाठी आल्या. त्यांची व्यथा ‘सकाळ’ने शब्दबद्ध केली. याच गावात आता स्पर्धा परीक्षेची अभ्यासिका सुरू झाली. 

एका बातमीतून निर्माण झालेले नाते ‘सकाळ’ आणि तिरझडा येथील महिलांकडून जपले गेले. ‘सकाळ’ प्रतिनिधींसह ‘दुर्री’ पुस्तकाचे लेखक राजा भोयर आणि संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते तसेच काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी गावाला भेट दिली. महिला आणि युवकांची वेदना समजून घेतली. आधारच हरविलेल्या या गावासाठी काहीतरी करायचे निश्‍चित झाले. नागपूर येथील नाथे पब्लिकेशनचे संजय नाथे यांनी एमपीएस, यूपीएससी, बॅंकिंग, रेल्वे आदी विविध परीक्षांची आवश्‍यक पुस्तके आणि संदर्भग्रंथ भेट दिले. यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त एकला महिला बचतगटाच्या उषाताई झिटे, शारदा शेंडे, वनिता शेंडे आदी महिलांनी बैठक घेतली. सहृदय पोलिस पाटील विनोद आगलावे यांनी त्यांच्यासाठी टिनाचे शेड असलेले घर उपलब्ध करून दिले. एका छोटेखानी कार्यक्रमातून या अभ्यासिकेचे उद्‌घाटन झाले. शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार, माजी आमदार ॲड. विजयाताई धोटे, माजी जिल्हा परिषद सदस्य मिलिंद धुर्वे, यशवंत इंगोले, साहेबराव पवार यांच्यासह ज्ञानेश्‍वर अलबनकर, निखिल शेंडे, नीलेश कोकांडे, आकाश कुटे, जनार्दन पोटे, दिनेश पोटे, अमित माहुरे, भूषण माहुरे, शेखर इचपाडे, मुकुल कुटे, पंकज झिटे, शुभम शेंडे, पोलिस पाटील विनोद आगलावे आदींची उपस्थिती होती. ॲड. विजयाताई धोटे व मिलिंद धुर्वे यांनीही यावेळी आर्थिक मदत केली. यातून मुला-मुलींचा उत्साह वाढला. यातील बरीच जण यवतमाळ व कळंब येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. येथील वाचनालयात गेल्या तीन वर्षांपासून ते अभ्यास करायचे. परंतु, आता स्पर्धा परीक्षांचे ग्रंथ उपलब्ध झाल्याने सरकारी नोकऱ्या काबीज करण्यासाठी जीवपाड प्रयत्न करू, अशी भावना ते व्यक्त करू लागले. तेव्हा अमरावतीचे सुप्रसिद्ध कवी बबन सराडकर यांच्या  

वादळाने वृक्ष कोसळतात तेव्हा, 
पाहिले पक्षी नभी झेपावताना
ऐनवेळी विझत गेले चंद्र-तारे 
काजवे जमा झाले अंधारताना... 
या ओळी अलगत आठवल्या. 

आमदार डॉ. अशोक उईके यांच्याकडून दहा लाख रुपये
टिनाच्या शेडमध्येच अभ्यासिका आहे. ही बाब राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अशोक उईके यांना देवानंद पवार यांनी सांगताच या उपक्रमाचे कौतुक करीत त्यांनी अभ्यासिकेची इमारत बांधकामासाठी १० लाख आमदारनिधीतून देण्याची तत्काळ घोषणा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 5th T20I: लखनौचा सामना 'धुक्यात' हरवला; आता भारत-दक्षिण आफ्रिका पाचवा सामना कधी व कुठे होणार, ते पाहा...

Nagpur News: डागा रुग्णालयात नवजात शिशूचा मृत्यू, नातेवाईकांचा गोंधळ, वैद्यकीय अधीक्षकांचे चौकशीचे आदेश

Viral Video: 'अरे पैसा नही चाहिये', रेल्वे स्टेनशवरील बाप-लेकीची गोड व्हिडिओ व्हायरल

पिंजऱ्यात शिकार, जंगलात राज! वाघीण 'तारा'ची सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दणक्यात एन्ट्री, शास्त्रीय पद्धतीने कशी राबवली 'सॉफ्ट रिलीज'?

Atal Bihari Vajpayee : राष्ट्रपतिपद स्वीकारण्यास वाजपेयींचा होता नकार; तत्कालीन माध्यम सल्लागार अशोक टंडन यांच्या पुस्तकात दावा

SCROLL FOR NEXT