काही सुखद

इतिहासाच्या पाऊलखुणांचा धांडोळा, दुर्गसंवर्धनासाठी युवकांची धडपड

इम्रान शेख

रहिमतपूर (जि. सातारा) : तारगाव (ता. कोरेगाव) परिसरातील काळोशी, मोहितेवाडी, दुर्गळवाडी येथील शिवप्रेमी युवकांनी लॉकडाऊनच्या काळात इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत वसंतगडच्या (ता. कऱ्हाड) संवर्धनासाठी एकवटून इतिहासाची पाने पुन्हा वाचण्याचा प्रयत्न करत इतिहासाच्या पाऊलखुणा शोधात आहेत. 

काळोशी येथील युवकांनी इतिहासाच्या पाऊलखुणा नावाचा व्हॉट्‌सअप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गडकोटांवर होणाऱ्या दुर्गसंवर्धन कामामध्ये सहभाग घेण्याचे सर्वांनी ठरवले. काही दिवसांपूर्वी दातेगड येथे सुरू असलेल्या दुर्गसंवर्धन कामात या युवकांनी सहभाग घेतला होता. आता संवर्धनाचा ध्यास घेतलेल्या या युवकांनी तळबीड येथील स्वराज्याचे पराक्रमी सेनापती हंबीरराव मोहिते यांचे वास्तव्य असलेल्या वसंतगडाच्या संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. स्वखर्चाने या युवकांनी दोन वेळा या गडावर मोहीम राबवली. त्यात गडावर पडझड झालेल्या वाड्यांचे अवशेष शोधून त्यावर वाढलेली झाडेझुडपे तोडून बाजूला करण्यात आली आहेत तसेच मातीचे ढिगारे उपसण्याचे कामही या युवकांनी स्वयंस्फूर्तीने हाती घेतलेले आहे. गडावर असणाऱ्या चंद्रसेन महाराज मंदिरात राहण्याची सोय होत आहे. तसेच पिण्यासाठी येथील कृष्णा तळ्यातील चवदार पाणी मिळत आहे. 

काळोशीच्या युवकांनी केलेल्या कामाची माहिती शिवप्रेमींपर्यंत पोचवण्यासाठी व्हॉट्‌सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब चॅनेल अशा सोशल मीडियाची मदत घेतली आहे. परंतु, हा ध्यास घेतलेल्या युवकांना आवश्‍यकता आहे आर्थिक मदतीची तसेच परिसरातील अनेक युवकांच्या श्रमशक्तीची. सातारा जिल्ह्यातील युवकांनी आपल्या इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्यास मदत करावी, असे आवाहन या ग्रुपमधील शुभम आठवे, रोहन जवळ यांनी केले आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT